top of page
        महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग
राज्यसेवा, विक्रीकर निरीक्षक, पोलिस सब इन्स्पेक्टर 

 

राजपत्रित अधिकारी दर्जाच्या परीक्षा

 

आयोगाच्या परीक्षांमध्ये खालील परीक्षांना आणि त्या उत्तीर्ण झालेल्यांना राजपत्रित अधिकारी हा दर्जा मिळतो. 

 

राज्यसेवा परीक्षेअंतर्गत तीन प्रमुख परीक्षा घेतल्या जातात. 

१. विक्रीकर निरीक्षक परीक्षा

२. पोलिस सब इन्स्पेक्टर 

३. राज्यसेवा (खाली नमूद पदांकरिता) परीक्षा 

 

राज्यसेवा परीक्षा 

हि परीक्षा महाराष्ट्रातील महत्वाची प्रशासकीय पदे जसे तहसीलदार, नायब तहसीलदार, उपनिबंधक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी- नगरपालिका/परिषद, वित्त व लेख अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कक्ष अधिकारी, गटविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक-सहकारी संस्था या पदांसाठी हि परीक्षा घेण्यात येते. 

 

परीक्षेचे स्वरूप:

१. पूर्व परीक्षा ४०० गुण 

    प्रत्येकी २०० मार्कचे दोन पेपर्स असतात.  

पेपर १-

१०० प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. प्रत्येक प्रश्नाला २ गुणआणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा होतात.

हा पेपर सामान्य ज्ञान तपासण्यासाठी असतो. यात सहा विषय समाविष्ट असतात-

१. चालू घडामोडी 

२. इतिहास- भारत व विशेषतः महाराष्ट्र 

३. भूगोल- विश्व , भारत आणि विशेषतः महाराष्ट्र 

४. भारताची राज्यघटना आणि महाराष्ट्राचे राजकारण व प्रशासन  

५. आर्थिक व सामाजिक विकास व पर्यावरण 

६. सामान्य विज्ञान 

 

पेपर २ हा बुध्दिमत्ता चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी (परिस्थितीजन्य प्रश्न) पाहण्यासाठी असतो. यामध्ये इंग्रजी/ मराठी कॉम्प्रिहेन्शन, लॉजिक, दहावीचे गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि निर्णयक्षमता यांचा समावेश असतो.

८० प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. प्रत्येक प्रश्नाला २ गुणआणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा होतात.

निर्णयक्षमतेच्या प्रश्नांसाठी गुण वजा होत नाहीत. 

 

उपलब्ध जागांच्या १०-१२ पट  विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. 

 

मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षा हि ८०० गुणांची असते. 

यात मराठी आणि इंग्रजी हे भाषा पेपर प्रत्येकी १०० मार्कांचे आणि सामान्यज्ञानाचे ४ प्रत्येकी १५० मार्कांचे असे ६ पेपर्स असतात. 

मराठी व इंग्रजी ची पातळी १२ वी तर सामान्य ज्ञानाची पातळी पदवी परीक्षेची असते. 

 

सामान्य अध्ययन चे पेपर्स वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. प्रत्येकी १५० गुण आणि २ तासांचा अवधी असतो. 

सामान्य अध्ययन१- हा इतिहास व भूगोलावर आधारित असतो. यात महाराष्ट्राचा आणि भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास, समाजसुधारक, स्वातंत्रोत्तर इतिहास, पृथ्वी भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल-विशेषतः आर्थिक भूगोल आणि कृषी या घटकांचा समावेश होतो. 

सामान्यअध्ययन२-  हा भारतीय संविधान, महाराष्ट्राचे राजकारण आणि प्रशासन यावर अवलंबून असतो. याम्ह्द्ये कायद्यांचाही समावेश होतो. 

सामान्य अध्ययन ३- हा पेपर मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास यावर आधारित असतो. 

सामान्य अध्ययन ४ हा पेपर अर्थव्यवस्था, विकासाचे अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित असतो. 

 

यानंतर १०० गुणांची मुलाखत असते. 

 

अंतिम गुणांसाठी मुख्य व मुलाखातीचेच गुण ग्राह्य धरले जातात. राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण हो झाल्यावर फार छान करिअर आपली वाट पाहत उभे असते. या पैर्क्षेची काठीण्य पटली केंद्र लोकसेवेच्या परीक्षेपेक्षा कमी असली तरी अभ्यास हा प्रचंड आहे. 

 

त्यामुळे चिकाटी, उत्साह आणि लक्ष्य समोर ठेऊन मेहनत घेणे गरजेचे आहे. 

 

तेंव्हा कंबर कसा आणि घ्या वसा राजपत्रित अधिकारी होण्याचा !

 

 

परीक्षेचे स्वरूप:

१. पूर्व परीक्षा ४०० गुणांची असून प्रत्येकी २०० मार्कचे दोन पेपर्स असतील.  

 

पेपर १-

१०० प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे- प्रत्येक प्रश्नाला २ गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा होतात.

 

यात सहा विषय समाविष्ट असतात-

१. चालू घडामोडी - २०१४ व २०१५

२. इतिहास- भारत व विशेषतः महाराष्ट्र 

३. भूगोल- विश्व , भारत आणि विशेषतः महाराष्ट्र 

४. भारताची राज्यघटना आणि महाराष्ट्राचे राजकारण व प्रशासन  

५. आर्थिक व सामाजिक विकास व पर्यावरण 

६. सामान्य विज्ञान 

 

पेपर २ हा बुध्दिमत्ता चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी (परिस्थितीजन्य प्रश्न) पाहण्यासाठी असतो. यामध्ये इंग्रजी/ मराठी कॉम्प्रिहेन्शन, लॉजिक, दहावीचे गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि निर्णयक्षमता यांचा समावेश असतो.

८० प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. प्रत्येक प्रश्नाला २ गुणआणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा होतात.निर्णयक्षमतेच्या प्रश्नांसाठी गुण वजा होत नाहीत. 

 

अभ्यास कसा कराल?

चालू घडामोडी:

चालू घडामोडींचा अभ्यास रोजच्या वर्तमानपत्रातून करणे आणि त्याची टिपणे काढणे अधिक सयुक्तिक आहे. प्रतियोगिता दर्पण, विझार्ड यासारखे एखादे दोन माशिके लावल्यास, तुमच्या नजरेतून सुटलेल्या अनेक बातम्या त्यात मिळतात. आयत्यावेळी अभ्यास करणार असाल तर अनेक मासिकांचे वर्षातील घटनांवर आधारित स्पेशल अंक निघतात.ते तुम्ही अभ्यासा.  परीक्षेमध्ये विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित घटना अधिक असतील. त्यामुळे, त्यांचा अधिक अभ्यास व्हावा. काही प्रकाशन महारष्ट्रातील घटना सुद्धा देतात. अशी पुस्तके पुण्यातील अप्पा बळवंत चौकात आपल्याला मिळतील. 

भारत शासनाचे दर वर्षाचे इअर बुक निघत असते. ते जास्त अधिकृत आहे.

 

इतिहास

 इतिहासाचे प्रागैतिहासिक, (सुरुवात ते १०००० ख्रिस्त पूर्व) , प्राचीन (हरप्पा संस्कृती ३००० ख्रिस्तपूर्व ते इसविसन १२००, मध्ययुगीन (इसविसन १२०० तो १७५७) आणि आधुनिक म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढा ( १८५७ ते १९४७) असे भाग करता येतात. यापैकी प्राचीन आणि आधुनिक यावर आयोगाचा अधिक भर असतो. स्वतान्त्र्यालाधा हा भाग विशेषतः पक्का करावा. यातील विविध टप्पे, विचारप्रवाह, घटना, विविध सुधारणा- आर्थिक , राजकीय. आणि सामाजिक तसेच ब्रिटिशांनी आणलेले विविध कायदे, विविध अधिकारी आणि त्यांनी आणलेले बदल,  संविधान निर्मितीची प्रक्रिया या गोष्टी विशेष महत्वाच्या आहेत. 

प्रतियोगिता दर्पांच्या इतिहास विशेष पुस्तिकांचा यासाठी वापर करता येईल. तसेच प्राचीन भारतीय इतिहास आणि आधुनिक भारतीय इतिहास हि दोन पुस्तके फार महत्वाची आहेत. 

 

भूगोल- विश्व , भारत आणि विशेषतः महाराष्ट्र 

भूगोल दहावीच्या पातळी वर विचारला जातो. शालेय क्रमिक ८वि ते १० वि आणि एनसीइआरटी ८-१० वि पुस्तके वाचून काढावीत. तसेच "जिस्ट ऑफ एनसीइआरटी: हे पुस्तक अधिक उत्तम आहे. 

महाराष्ट्राचा अभ्यास करता पर्जन्य हवामान यात होणारे बदल, विविध पिके,  मृदा, महाराष्ट्रातील प्राणी, अभयारण्ये या सर्वाचा अभ्यास करावा. 

 

पर्यावरण शास्त्र हा विशेष भाग मागील तीन वर्षापासून परीक्षेत विचारला जातो. पर्यावरण आणि पर्यावरण संरक्षनाबाब्तीतील विविध करार,  परिषदा याबाबतीत प्रश्न विचारले जातात. 

 

भारताची राज्यघटना आणि महाराष्ट्राचे राजकारण व प्रशासन

आयोगाच्या परीक्षेतील हा महत्वाचा विषय आहे. यामध्ये संविधान, तरतुदी, भारतीय प्रशासन आणि त्यातील तरतुदी, विविध यंत्रणा त्यांचे अधिकार, संविधान निर्मिती या वर प्रश्न विचारले जातात. 

यासाठी प्रतियोगिता दर्पांचा या विषयातील विशेष इस्श्यू अभ्यासावा. 

 

आर्थिक विकास

भारतिय अर्थव्यवस्था. अर्थशास्त्र या विषयावर अभ्यास केला जातो. दत्त आणि सुंदरम यांचे भारतीय अर्थव्यवस्था यावरील पुस्तक उत्तम आहे. प्रतियोगिता दर्पणचा अर्थव्यावास्थेपारील इश्यू चांगला आहे. 

 

 सामान्य विज्ञान 

दहावीच्या पातळीचे विज्ञान विचारले जाते. यासाठी ८वि ते ० वि ची पुस्तके अभ्यासावी. 

 

पेपर २

बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी/मराठी आणि व्यक्तिमत्व विकास (निर्णय क्षमता) यावर हा पेपर आधारित असतो. 

 

यासाठी आर.एस.अग्रवाल यांचे लॉजिक हे पुस्तक चांगले आहे. मागील वर्षांचे पेपर अभ्यास्वेत. 

इंग्रजी किंवा मराठी साठी दहावीच्या पुस्तकांचा आणि प्रश्नांचा अभ्यास करावा. 

पोलिस उपनिरीक्षक 

पोलिस महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध क्षेत्र. सामान्य माणसांच्या आयुष्याला स्पर्श करणारे,त्यांचे रक्षण करणारे, समाजातील अन्याय आणि अन्यायी गोष्टींना पायबंद घालण्याचे काम करतात. मात्र आपल्याकडे पोलिस भरती म्हणजे हवालदार पदासाठी होणारी भरती एवढेच माहिती असते. 

 

प्रशासकीय सेवा परीक्षमार्फत पोलिस खात्यातील अधिकारी केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे पोलिस खात्यातील सर्वोच्च पदे भरली जातात. यासाठी घेण्यात येणाऱ्या लोकसेवा आयोग परीक्षेद्वारे हि पदे भरली जातात. या पदांना आयपीएस पदे म्हटले जाते. 

 

त्याखालोखाल येणारी पदे ही लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतून भरली जातात. त्यामुळे पोलिस क्षेत्रात जायचे असेल तर पदवी करून अधिकारी होण्याची स्वप्ने पहा. 

 

परीक्षेचे स्वरूप:

हि परीक्षा तीन पातळीत घेतली जाते. 

पूर्व परीक्षा: १०० गुण 

मुख्य परीक्षा २०० गुण 

शारीरिक चाचणी १०० गुण 

 

पूर्व परीक्षा:

यात एक पेपर असतो. 

१. सामान्य क्षमता चाचणी - १०० प्रश्न १०० गुण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात, आणि वेळ १ तास असतो. 

अभ्यासक्रम:

१. चालू घडामोडी

२. नागरिकशास्त्र 

३. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 

४. भूगोल 

५. भारतीय अर्थव्यवस्था

६. सामान्य विज्ञान

७. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित 

 

मुख्य परीक्षा

पूर्व परीक्षा उत्तीर्णाना मुख्य परीक्षेस बसता येते. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. 

या परीक्षेत दोन पेपर असतात:

१. मराठी ६० प्रश्न ६० गुण 

   इंग्रजी ४० प्रश्न ४० गुण   दोन्ही मिळून वेळ १ तास 

२. सामान्य ज्ञान, बुद्धिमापन 

    आणि विषयाचे ज्ञान       १०० प्रश्न, १०० गुण वेळ १ तास

 

अभ्यासक्रम:

१. मराठी:सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी-वाकप्रचार  उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न 

२. इंग्रजी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी-वाकप्रचार  उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न 

३. सामान्य ज्ञान, बुद्धिमापन आणि विषयाचे ज्ञान:

 १) चालू घडामोडी- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय 

 २) बुद्धिमत्ता चाचणी- 

 ३) महाराष्ट्राचा भूगोल-

 ४) महाराष्ट्राचा इतिहास-

 ५) भारतीय राज्यघटना

 ६) माहिती अधिकार अधिनियम २००५

 ७) संगणक व माहिती तंत्रज्ञान 

 ८) मानवी हक्क आणि जबाबदार्या 

 ९) मुंबई पोलिस कायदा 

 १०) भारतीय दंडसंहिता 

 ११) फौजदारी दंड संहिता, १९७३

 १२) भारतीय पुरावा कायदा 

 

शारीरिक चाचणी २०० गुण 

पुरुष                                         महिला 

१.गोळाफेक-७.२६०किग्रा-१५गुण   १.गोळाफेक-४ किग्रा-२० गुण 

२.पूल-अप्स- ८ गुण २० गुण    २. धावणे (२०० मी)- ४० गुण 

३. धावणे (८०० मी) ५० गुण    ३. चालण्याची क्षमता- ३ किमी- ४० गुण 

४. लांब उडी - १५ गुण 

          पुरुष                    महिला

उंची:     १६५ सेमी               १५७ सेमी 

छाती       ८४ सेमी 

(फुगवण्याची क्षमता ५ सेमी)

 

विक्रीकर निरीक्षक 

विक्रीकर निरीक्षक हे अतिशय सन्मानाचे गट- ब अराजपत्रित पद आहे. महाराष्ट्र राज्यात होणार्या वस्तूंच्या विनिमयावरील करविषयक हा अधिकारी असतो. 

 

याचे दोन टप्पे असतात:

१. पूर्व परीक्षा- ३०० गुण 

२. मुख्य परीक्षा २०० गुण 

 

शैक्षणिक पात्रता: कुठल्याही विषयातील पदवी 

 

पूर्व परीक्षा:

यात एक पेपर असतो. 

१. सामान्य क्षमता चाचणी - १०० प्रश्न १०० गुण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात, आणि वेळ १ तास असतो. 

प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांना एक गुण वजा होतो. 

अभ्यासक्रम:

१. चालू घडामोडी

२. नागरिकशास्त्र 

३. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 

४. भूगोल 

५. भारतीय अर्थव्यवस्था

६. सामान्य विज्ञान

७. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित 

 

 मुख्य परीक्षा

पूर्व परीक्षा उत्तीर्णाना मुख्य परीक्षेस बसता येते. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. 

या परीक्षेत दोन पेपर असतात:

१. मराठी ६० प्रश्न ६० गुण 

   इंग्रजी ४० प्रश्न ४० गुण   दोन्ही मिळून वेळ १ तास 

२. सामान्य ज्ञान, बुद्धिमापन 

    आणि विषयाचे ज्ञान       १०० प्रश्न, १०० गुण वेळ १ तास

 

 

 

अभ्यासक्रम:

१. मराठी:सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी-वाकप्रचार  उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न 

२. इंग्रजी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी-वाकप्रचार  उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न 

३. सामान्य ज्ञान, बुद्धिमापन आणि विषयाचे ज्ञान:

 १) चालू घडामोडी- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय 

 २) बुद्धिमत्ता चाचणी- 

 ३) महाराष्ट्राचा भूगोल-

 ४) महाराष्ट्राचा इतिहास-

 ५) भारतीय राज्यघटना

 

.

bottom of page