top of page

आयबीपीएस  

स्टेट बँक सोडून इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी आयबीपीएस हि संस्था स्पर्धा परीक्षा घेते. 

यात

१. क्लार्क आणि 

२. प्रोबेशनरी ऑफिसर्स 

या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. 

क्लार्क:

१. इंग्रजी 

२. बुद्धिमत्ता चाचणी 

३. गणित 

४. सामान्य ज्ञान विशेषतः बँकिंग क्षेत्राशी संबंधित 

५. आणि संगणक 

हे पाच विषय प्रयेकी ४० गुणांसाठी म्हणजे एकूण परीक्षा २०० गुणांसाठी घेण्यात येते. यासाठी एकूण २ तासांचा अवधी असतो. 

 

प्रोबेशन ऑफिसर्स 

१. इंग्रजी  ५० गुण 

२. बुद्धिमत्ता चाचणी  ४० गुण 

३. गणित ५० गुण 

४. सामान्य ज्ञान विशेषतः बँकिंग क्षेत्राशी संबंधित ४० गुण 

५. आणि संगणक २० गुण 

अशी एकूण २०० गुणांची परीक्षा असते. 

 

स्पेशलाइज्ड ऑफिसर्स 

स्टेट बँकेप्रमाणे विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्षेत्रांमधील पदवीधरांसाठी आणि पदव्युत्तर पदवीधरांची स्पेशलाइज्ड ऑफिसर्स म्हणून भरती केली जाते.  

आयबीपीएस कायदा अधिकारी, कृषी अधिकारी, तांत्रिक अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, मनुष्य संसाधन अधिकारी, मार्केटिंग अधिकारी या पदांसाठी भरती करते. 

 परीक्षेचे स्वरूप:  

१. इंग्रजी २५ गुण 

२. रिझनिंग ५० गुण 

३. बुद्धिमत्ता चाचणी ५० गुण 

४. विशेष क्षेत्राचे ज्ञान ७५ गुण 

अशी २०० गुणांची परीक्षा घेण्यात येते. यासाठी २ तासांचा अवधी असतो.   

या व्यतिरिक्त रिझर्व बँक आणि नाबार्ड देखील आपल्या बँकातील क्लार्क, व्यवस्थापन ट्रेनी आणि अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी परीक्षा घेत असते. त्याची माहिती आपण पुढील भागात घेऊ. 

 

तेंव्हा मराठी मुलांनो, पदवी नंतर कुठलीही बेक ऑफिस किंवा अकौंटस ची नोकरी पाहण्यापेक्षा थेट बँकेत रुजू व्हा. 

 

bottom of page