top of page

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरली जाणारी इतर पदे 

सहाय्यक 

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील गट-ब अराजपत्रित पदे भरण्यासाठी हि परीक्षा घेतली जाते. 

किमान पात्रता: पदवी 

 

परीक्षेचे स्वरूप:

पूर्व परीक्षा (१०० गुण) आणि

मुख्य परीक्षा (२०० गुण) 

 

पूर्व परीक्षा 

१०० प्रश्न १०० गुण. 

कालावधी १ तास 

प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. 

 

अभ्यासक्रम:

१. चालू घडामोडी

२. नागरिकशास्त्र 

३. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 

४. भूगोल 

५. भारतीय अर्थव्यवस्था

६. सामान्य विज्ञान

७. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित  

 

मुख्य परीक्षा

यात दोन पेपर असतील.

१. मराठी ६० प्रश्न- ६० गुण 

   इंग्रजी- ६० प्रश्न-६० गुण 

एकूण मिळून एक तास कालावधी असेल. 

काठीण्य पातळी- मराठी १२वी, इंग्रजी- पदवी 

२. सामान्य ज्ञान, बुद्धिमापन १०० प्रश्न १०० गुण 

काठीण्य पातळी- पदवी 

अभ्यासक्रम:

१. चालू घडामोडी

२. बुद्धिमता चाचणी 

३. महाराष्ट्राचा भूगोल 

४. महाराष्ट्राचा इतिहास

५. भारतीय राज्यघटना 

६. माहिती अधिकार अधिनियम २००५

७. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान 

८. राजकीय यंत्रणा  

९. जिल्हा प्रशासन, ग्रामीण व नागरी शासन 

१०. न्यायमंडळ 

परीक्षा मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे या चार परीक्षा केंद्रांवर घेण्यात येते. 

 

कर सहाय्यक 

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट-क यासाठी हि परीक्षा घेतली जाते. यातून पुढे विक्रीकर निरीक्षक गट ब या पदावर पदोन्नती मिळू शकते.  

 

पात्रता: पदवी आणि मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी ४० शप्रमी. प्रमाणपत्र 

परीक्षेचे स्वरूप 

यात फक्त लेखी परीक्षा ४०० गुणांची घेण्यात येते. 

एकच पेपर २०० प्रश्न ४०० गुण. 

यात चार विषय असतात. प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचेच असतात. 

१. मराठी 

२. इंग्रजी 

३. सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी

४. पुस्तपालन आणि लेखाकर्म (बुक कीपिंग आणि अकाऊन्टन्सी)

 

अभ्यासक्रम 

१. मराठी 

२. इंग्रजी

३. सामान्य ज्ञान:

१. आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास 

२. महाराष्ट्राचा भूगोल 

३. नागरिकशास्त्र 

४. राज्यघटना 

४. चालू घडामोडी 

५. बुद्धिमत्ता चाचणी

६. पुस्तपालन आणि लेखाकर्म 

७. आर्थिक सुधारणा आणि कायदे 

 

 

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेत गट-क पदासाठी हि परीक्षा घेतली जाते. 

 

पात्रता:  

अ) माध्यमिक शालांत किंवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा आणि 

आ)ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा 

मेकानिकल इंजिनीअरिंग मधील ३ वर्षांची पदविका 

किंवा समतुल्य अर्हता

  समतुल्य अर्हतेत खालील पदविकांचा समावेश होतो. 

 १) डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नोलॉजी 

 २) डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग

 ३) डिप्लोमा इन मशीन टुल्स मेंटेनन्स 

 ४) डिप्लोमा इन फेब्रीकेशन आणि इरेक्षन टेक्नोलॉजी

 ५) डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग 

  ६) डिप्लोमा इन मेटालर्जी

आणि मोटार वाहन, मोटार सायकल, जड माल वाहतूक आणि जड प्रवासी वाहतूक यापैकी एक अशा किमान तीन वाहने चालवण्याची कायमस्वरूपी अनुज्ञप्ती (Licence) 

अनुभव: वार्षिक उलाढाल ३-५ लाख असलेल्या गेरेज किंवा कार्यशाळेत हलके व जड माल वाहतूक वाहन व जड प्रवासी वाहतूक वाहन यांचं दुरुस्तीचे आणि परिरक्षेचे  पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून किमान १ वर्षाचा अनुभव.  

 

शारीरिक क्षमता

   पुरुष                               महिला

उंची:     १६३ सेमी                 १५५ सेमी 

छाती    फुगवून ८४ सेमी        वजन- ४५ किग्रा

दृष्टी चांगली रातांधळेपणा नसावा. 

 

परीक्षेचे स्वरूप 

परीक्षेचे तीन टप्पे असतात:

१. पूर्व परीक्षा १०० गुण 

२. मुख्य परीक्षा ३०० गुण 

३. मुलाखत ५० गुण 

 

पूर्व परीक्षा

पूर्व परीक्षेत एक १०० गुणांचा पेपर असतो. वेळ एक तास आणि प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. 

 

१. सामान्य अध्ययन- ५० गुण 

२. बुद्धिमापन  ३० गुण

३. मेकानिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग संबंधित 

  चालू घडामोडी- २० गुण   

 

मुख्य परीक्षा 

मुख्य परीक्षेमध्ये एक पेपर असतो. प्रश्न  बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात.

 १. मेकानिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग- १५० प्रश्न ३०० गुण- वेळ दीड तास.

परीक्षेची पातळी पदविका परीक्षेसारखी असते. 

 

लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणार्यांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येते. 

 

मुलाखत

यात उतीर्ण होणार्यांची ५० गुणांची मुलाखत घेण्यात येते. 

bottom of page