top of page
 महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 

महाराष्ट्र वनांचा प्रदेश आहे. भारतीय मानकानुसार किमान ३३% भूप्रदेश वनांखाली असणे आवश्यक आहे. मात्र ते प्रमाण भारतात आणि महाराष्ट्रात  कमी आहे. महाराष्ट्र विविध वन उत्पादनांनी आणि प्राण्यांनी समृद्ध प्रदेश आहे. त्यामुळे वनांचे  क्षेत्र, प्राण्यांची शिकार यामुळे वन अधिकार्यांवरील जबाबदारी वाढते. हे वन अधिकारी महाराष्ट्र  वनसेवा परीक्षेद्वारे नियुक्त  जातात. 

 

सहाय्यक वनरक्षक (गट - अ) आणि वनक्षेत्रपाल (गट- ब) अशा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. 

 

शैक्षणिक पात्रता: १) वनस्पती शास्त्र, २) कृषी, ३) गणित ४) रसायन शास्त्र, ५) भूशास्त्र, ६) सांख्यिकी ७) प्राणीशास्त्र, ८) भौतिक शास्त्र ९) उद्यानविद्या या विषयातील पदवीधर किंवा १) कृषी २) अभियांत्रिकी ३) पशुसंवर्धन आणि ४) पशुवैद्यकशास्त्र या विषयातील स्नातक पदवीधर

या परीक्षेस बसू शकतात. 

 

खालील प्रमाणे शारीरिक क्षमता असणे आवश्यक असते. 

कंसातील आकडा अनुसूचित जमातीतील उमेदवारांकरिता आहे. 

  पुरुष                                  महिला

उंची:     १६३(१५२.५) सेमी     १५० (१४५) सेमी 

छाती       ७९ सेमी                छाती  ७४ सेमी (फुगवण्याची क्षमता ५ सेमी)

(फुगवण्याची क्षमता ५ सेमी)    

 

दृष्टी: ४+ OD  डोळ्याची दृष्टीक्षीणता ६/६ 

पुरुषांनी २५ किमी आणि महिलांनी १४ किमी अंतर चार तासात चालून दाखवणे आवश्यक आहे. 

 

परीक्षेचे स्वरूप:

परीक्षेचे तीन टप्पे असतात:

१) पूर्व परीक्षा- २०० गुण 

२) मुख्य परीक्षा - ४०० गुण आणि  

३) मुलाखत- ५० गुण 

 

पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात

पूर्व परीक्षा 

यात एक विषय असतो. 

सामान्य अध्ययन- १०० प्रश्न २०० गुण- वेळ १ तास. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. 

 

अभ्यासक्रम:

 १) मराठी भाषा, 

२) इंग्रजी भाषा

३) चालू घडामोडी 

४) सामान्य बौद्धिक चाचणी आणि 

५) सामान्य विज्ञान  

 

मुख्य परीक्षा 

मुख्य परीक्षेत दोन विषय असतात. 

१) सामान्य अध्ययन- १०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जातात. याला एक तास वेळ असतो. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. 

     १) भारतीय आणि महाराष्ट्राचा इतिहास, 

     २) सामाजिक आणि आर्थिक बाबी, 

     ३) भारतीय राज्यघटना, 

     ४) स्थानिक आणि ग्रामीण जीवन, आणि 

     ५) आर्थिक व सामाजिक विकास 

 

२) पर्यावरण संरक्षण - १०० प्रश्न २०० गुण . त्या विषयातील पदवी च्या पातळीचे प्रश्न विचारले जातात. 

 

मुलाखत ५० गुणांची होते.  

 

bottom of page