top of page
देशाचे खड्गहस्त व्हा

मराठा रेजिमेंट नावाची स्वतःची एक रेजिमेंट भारतीय सैन्यात आहे. तिची प्रेरणादायी आरोळी "छत्रपति शिवाजी महाराज कि जय" ही आहे. संपूर्ण सैन्याच्या सर्व बटालियन पैकी हि एकमेव आरोळी एका महापराक्रमी प्रत्यक्ष होऊन गेलेल्या पुरुषाच्या नावाने आहे. बाकी सर्व आरोळ्या ह्या देवांच्या नावे आहेत. 
सांगण्याचा मुद्दा हा, कि एका मराठी माणसाच्या नावाने गर्जना असूनही , मराठी मुलांचे सैन्यात जाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. 
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी तरुणांना हाक दिली होती कि महाराष्ट्राने देशाचे खड्गहस्त झाले पाहिजे. आज ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटले पाहिजे.

 

भारतीय सैन्यात फक्त युद्धच लागते का?

एक फार मोठा गैरसमज  मराठी तरुणांमध्ये आहे कि सैन्य म्हणजे केवळ युद्ध. त्यामुळे अनेक आया आपला वंशाचा दिवा सैन्यात नको म्हणून पाठवीत नाहीत. अनेकांना स्वतःला युद्ध करायचे नसते त्यामुळे ते सैन्यात जाऊ इच्छित नाहीत. भीती आणि गैरसमज यामुळे सैन्यात जाणार्या मराठी तरुणाचे प्रमाण फार कमी आहे. 

 

सैन्याची रचना 

हा गैरसमज दूर करण्यासाठी अगोदर भारतीय सैन्याची रचना कशी आहे ते आपण पाहू. 

 

भारतीय सैन्याचे

१. पायदळ

२. वायुदल

 ३. नौसेना असे तीन भाग पडतात. 

 

या तिन्ही दलांमध्ये: 

१.  प्रत्यक्ष युद्धात सामील होणारे सैनिक   

२. ऑफिसर्स- मिलिटरी आणि इतर ऑफिसर्स आणि 

३.  ऑफिसर्स (तांत्रिक विभाग) असे तीन भाग पडतात. 

 

यापैकी युद्धात सामील होणारे सैनिक प्रत्यक्ष युद्धभूमीवर असतात. ऑफिसर्स लेवल ही फार प्रतिष्ठित सैन्यातील नोकरी आहे. त्यांना फार कमी प्रसंगी प्रत्यक्ष युद्धास सामोरे जावे लागते. तांत्रिक विभाग हा पूर्ण युद्धापासून अलिप्त असतो. मात्र युद्ध सामग्री सज्ज करणे हे अभियांत्रिकी गटाचे काम असते, आयटी विभाग संगणकाचे काम पाहतो इत्यादी. 

 

आम्ही जेंव्हा पदवीधरांना 'सैन्यात जा' अशी हाक देतो आहोत तेंव्हा ऑफिसर्स लेवल सैन्यातील पदांकडे आमचा रोख आहे. या पदांना मिळणारी वागणूक अतिशय प्रतिष्ठेची आदराची असते आणि त्यांचा रुतबा काही औरच असतो. मराठी तरुण सैन्यात जाने टाळून इतकी वर्षे या रुतब्याला मुकत आलेला आहे. 

 

कम्बाइण्ड डिफेन्स परीक्षा 

सध्या या परीक्षेची जाहिरात आलेली आहे. त्यामुळे अगोदर आपण या परीक्षेसंदर्भात माहिती मिळवू. वर नमूद केल्याप्रमाणे हि परीक्षा ऑफिसर्स लेवल पदे भरण्यासाठी असते. यात युद्धातील आणि युद्धात भाग न घेणारे ऑफिसर्स अशी दोन्ही पदे भरली जातात. 

 

ऑगस्ट आणि मार्च अशा दोन वेळेस अर्ज निघतात. 

फेब्रुवारी आणि ओगस्ट या दोन वेळेस परीक्षा घेतल्या जातात. 

 

पात्रता: पदवी 

 

वयोमर्यादा:

युद्धातील अधिकारीपदे:

आर्मी- १९-२४ वर्षे  पात्रता: कुठलीही पदवी 

नेव्ही १९-२२ वर्षे    पात्रता: बीएस्सी किंवा अभियांत्रिकी पदवी 

एअरफोर्स- १९-२३ वर्षे  बीएस्सी किंवा अभियांत्रिकी पदवी 

युद्धात भाग न घेणारे  अधिकारी 

वय: १९-२५ वर्षे   पात्रता: कुठलीही पदवी 

 

परीक्षेची रचना:

युद्धातील अधिकारी पदे:

एकूण गुण: ३००

इंग्रजी : १००

सामान्य ज्ञान :१०० 

बेसिक गणित : १०० 

 

युद्धात भाग न घेणारे अधिकारी (पुरुष व महिलांसाठी) 

एकूण गुण: २००

इंग्रजी : १००

सामान्य ज्ञान :१०० 

 

या  नंतर दीड वर्षांचे ट्रेनिंग देण्यात येते. आर्मीचे ट्रेनिंग डेहराडून, नेव्हीचे एझिमला, एअरफोर्स  हैद्राबाद आणि 

ऑफिसर्स ट्रेनिंग चे चेन्नई येथे ट्रेनिंग देण्यात येते. 

 

तांत्रिक (पुरुष व महिलांसाठी)

या शिवाय अभियांत्रिकी पदवीधरांसाठी टेक्निकल ग्रेज्युएट कोर्स हि परीक्षा घेण्यात येते. 

वय: २० ते २७ 

पात्रता: अभियांत्रिकी पदवीधर किंवा  शेवटच्या वर्षातील. 

 

आर्मी/नेव्ही एज्युकेशन कोर्प (पुरुष व महिलांसाठी)

वय: २० ते २७ वर्षे 

पात्रता: एम ए( विषय) 

 

बारावी नंतरचा प्रवेश:

१. एनडीए 

बारावी पर्यंतच आर्मीत जाण्यासाठी तुमचे मन बनले असेल तर पदवी पर्यंत न थांबता पुण्यातील नेशनल डिफेन्स एकेडमी या संस्थेत तीन वर्षांचा कोर्स केला जातो. तीन वर्षांनतर एका वर्षाचे आर्मी, नेव्ही वा एअरफोर्स चे कोर्सेस दिले जातात. यामध्ये वर नमूद केलेली प्रवेश परीक्षा देणे गरजेचे नसते तसेच प्रशिक्षणाचा कालावधी देखील वाचतो. 

 

एनडीए साठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ती साधारण डिसेंबर मध्ये अर्ज मागवले जातात. 

पात्रता: आर्मी:- १२ वी (कुठल्याही विषयातून)

           नेव्ही - १२ वी विज्ञान 

           एअर फोर्स : १२ वी विज्ञान

 

२. एसएसबी- केडेट ट्रेनिंग विंग 

पात्रता: १२ वि विज्ञान 

प्रशिक्षण : पाच वर्षे - एक वर्ष गया आणि चार वर्षे केडेट ट्रेनिंग विंग (आर्मी) 

 

इतर: (पुरुष व महिलांसाठी)

१. कायदा पदवीधर:

कायद्याचे पदवीधर असाल तर सैन्य तुम्हाला बोलावू इच्छिते. 

वय: २१ ते २७

पात्रता: ५५% सह कायद्याची पदवी व पदव्युत्तर आणि बर कौन्सिल कडे नोंदणी 

प्रशिक्षण: ४९  आठवडे 

ऑक्टोबर/नोव्हेंबर आणि एप्रिल/मे दरम्यान अर्ज मागवले जातात. 

 

२. अभियांत्रिकी

वय : २१ ते २७ 

पात्रता: अभियांत्रिकी पदवी

 

अधिक माहितीसाठी:-

joinindianarmy.nic.in

nausena-bharti.nic.in

careerairforce.nic.in

 

प्रबोधक- ९९६७७०६१५० 

 

तेंव्हा सज्ज व्हा भारतीय सैन्यात जाऊन भारताचा आणि तुमच्या कुटुंबाचा अभिमान

होण्यासाठी !

 

bottom of page