top of page

तुम्हाला सैन्यात जाण्याची खूप इच्छा आहे?

पण वय निघून गेले असे वाटते?

तुमच्यामध्ये सामाजिक काम करण्याची इच्छा आहे ?

तुम्हाला सैन्याचा एक भाग व्हावेसे वाटते?

तुमची वरील उत्तरे जर हो असतील,  तर याचा अर्थ तुम्हाला टेरीटोरीअल आर्मी मध्ये यायचे आहे . मागील निमलष्करी दलातील संधी या लेखात आपण या विषयाचा ओझरता उल्लेख पहिला होता. आता या क्षेत्राची पूर्ण माहिती घेऊया.  

 

काय आहे टेरीटोरीअल आर्मी?

टेरीटोरीअल आर्मी हा भारताच्या पायदळाचा भाग आहे. प्रादेशिक आर्मी ची भरती भारतीय आर्मी तर्फेच केली जाते. सामान्य नागरिकांनी सैन्यामध्ये येण्यासाठी प्रादेशिक आर्मी हा एक सुवर्णमध्य आहे. 

 

पदे:

प्रादेशिक आर्मीत तीन पदे भरली जातात

१. जवान

२. ज्युनिअर कमांडिंग ऑफिसर 

३. ऑफिसर 

 

जवान

पात्रता: दहावी

प्रादेशिक आर्मी मार्फत जवानांसाठी जाहिराती येतात आणि त्यानंतर हि पदे भरली जातात. 

 

ज्युनिअर कमांडिंग ऑफिसर:

दहावी झालेल्या आणि एनसीसी केलेल्यांसाठी हि पदे जाहीर केली जातात. त्यासाठी आर्मी मार्फत जाहिरात दिलीजाते . 

 

अधिकारी

या लेखाचा मुख्य उद्देश्य ऑफिसर पदाबद्दल माहिती देणे हा आहे. कारण हे ऑफिसर पद सैन्यातील ऑफिसर पदाबरोबरीचे आहे. त्याचा पगार आणि इतर सोयीसुद्धा सैन्याच्या अधिकारी पदाप्रमाणेच असतात. 

 

पात्रता: 

शैक्षणिक पात्रता: अर्जदार किमान पदवीधर असावा. 

वय: किमान १८ ते ४२ वर्षे 

नोकरी किंवा व्यवसाय: अर्जदार नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करीत असला पाहिजे.   

 

नोकरीच्या शर्ती: 

सैन्यात तुम्ही ऑफिसर झालात कि ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळी सैन्य तुम्हाला बोलवेल.  इतर वेळेस तुम्ही तुमची नोकरी व्यवसाय किंवा इतर काहीही करण्यास सज्ज आहात.  इतकेच नव्हे तुम्हाला ज्या वेळेस सेवा देण्यास किंवा ट्रेनिंग जाईल तेंव्हा तुम्हाला त्याचा पगार दिला जाईल. २० वर्षाच्या (फिसिकल) सर्विस नंतर पेन्शनही मिळेल. 

सेवा देत असताना तुम्हाला सैन्यातील अधिकार्यांना मिळत असणर्या इतर सुविधाही मिळतात.  

 

अजून तुम्हास काय हवे?

इतर कुठेही नसणारी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मिळेल !  इतर कुठल्याही नोकरीत नसणारी प्रचंड प्रतिष्ठा! कारण तुम्ही आता भारतीय सैन्याचे अधिकारी आहात, तुम्हाला मिळणारे किमान पद आहे "लेफ्टनंट". लेफ्टनंट पासून  पदोन्नती होत होत अधिकारी ब्रिगेडीअर या पदापर्यंत पोहोचू शकतो. अर्थात पदांप्रमाणे पगारही वाढत जातो. 

 

तुम्ही ट्रेकर असाल- 

तर सह्याद्रीचे वारे तुमच्या नसानसातून वाहत असतील. 

या सह्याद्रीच्या खोर्यात घडलेल्या पराक्रमी इतिहासाचे श्वास तुमच्या श्वासात मिसळत असतील. मग तुम्ही सैन्याचाच भाग का होत नाही? तुमच्यातील साहसाला अजून चांगले वळण कुठे मिळेल? शिवाय तुम्हाला टेरिटोरीअल आर्मी मध्ये काम करताना नैसर्गिक/ इतर आपत्ती मध्ये काम करून लोकांना मदत करण्याची संधी मिळेल, तेही सैन्याचा भाग म्हणून, आणि पगार मिळून! तुमच्यातील ट्रेकर ला अजून काय हवे?            

 

तुम्ही जिम करत असाल…  

तर तुमची शक्ती तुमची उर्जा सैन्यासाठी आणि भारताच्या रक्षणासाठी खर्च करा. याहून अधिक चांगले क्षेत्र कुठले असेल. जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमची जिम, तुमचे शरीर  सौष्टव चांगल्या कामाला खर्ची व्हावे तर टेरिटोरीअल आर्मी सारखी इतर योग्य जागा नाही. 

    

तुम्ही खेळाडू किंवा छांदिष्ट आहात का?

तर मग टेरिटोरिअल आर्मी सारखी जागा नसावी. तुम्ही तुमच्या छंदाकडे किंवा खेळाकडे पूर्णवेळ लक्ष देणार असाल तर टेरीटोरीअल  चा भाग व्हा आणि बाकी वेळेस तुमचा छंद आणि खेळ सांभाळा!

 

व्यवसायाची उत्तम संधी!

मात्र एक गोष्ट मनाशी नक्की करा, कि  हे तुमचे उत्पनाचे मुख्य साधन नाही. तुम्हाला बोलावले जाई तेंव्हाच तुम्हाला पगार मिळणार आहे. एरवी तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय उभारा, अगदी मोठा नाही तरी लहान! आणि ते तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन होऊ द्या. सैन्यातील पगार हि तुमची गुंतवणूक होऊ द्या. मग बघा! तुमचे व्यवसायाचे स्वप्नही पूर्ण होईल, घरातील उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील अर्थात घरची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमची गुंतवणूक वाढेल म्हणजे कायमस्वरूपी आर्थिक सक्षमता तुमच्याकडे येईल! 

 

काय करावे लागेल?

टेरीटोरीअल आर्मी तुम्हाला ऑफिसर होण्याची  संधी वर्षातून दोन वेळा देते. 

स्पर्धा परीक्षेने उमेदवारांची निवड केली जाते आणि त्यानंतर मुलाखत होते. 

 

स्पर्धा परीक्षेसाठी टेरीटेरीअल आर्मीने स्वतः एक पुस्तकही काढले आहे जे वेबसाईट वर उपलब्ध आहे. 

 

परीक्षेचा अभ्यासक्रम 

१. बुद्धिमत्ता चाचणी 

२. गणित 

३. इंग्रजी 

४. सामान्य ज्ञान 

 

अधिक माहितीसाठी संपर्क:

प्रबोधक: प्रबोधक

१/४  शंकर निवास, बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व  मुंबई ४०००६० 

हर्षद माने ९९६७७०६१५०

 

तेंव्हा तयार व्हा, तुमची नोकरी किंवा व्यवसाय करता करताच भारतीय सैन्याचे एक अधिकारी व्हायला. आणि तुमच्या आई -वडिलांच्या, तुमच्या बहिण भावाच्या, बायकोच्या, मित्र मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या डोळ्यातील अभिमान व्हायला!

 

टेरीटोरीअल आर्मी

bottom of page