top of page
  महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 

अभियांत्रिकी हि एक अतिशय मनाची पदवी. त्यातूनही स्थापत्य अभियांत्रिकी होणार्या विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक आहे. अभियांत्रिकी झाल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.  प्रत्येकाला योग्य दिशा सापडेलच असे नाही. त्यामुळे अभियांत्रिकी करून उपयोग काय असे लागते. अशा वेळेस स्थापत्य अभिय्क़्न्त्रिकि झालेल्या मुलांना महाराष्ट्र शासनात एक सन्मानाची नोकरी वाट पाहत उभी असते याची कल्पना नसते. तीही अ आणि ब गटातील राजपत्रित पदे. एकतर अभियांत्रिकी पदवी आणि वर महाराष्ट्र शासनात, त्यामुळेया पदांची प्रतिष्ठा काय असेल याची तुम्ही कल्पना करूशकता. 

 

मागील लेखामध्ये आपण भारतीय प्रशासनातील अभियांत्रिकी सेवांबद्दल माहिती घेतलि होती. त्याच धर्ती वर महाराष्ट्र शासन अभियांत्रिकी सेवा परीक्षाघेते. त्या सेवांची माहिती घेऊ. 

 

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 

महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा गट अ आणि गट ब अशा दोन पदांसाठी घेतली जाते. हि दोन्ही पदे राजपत्रित आहेत. 

 

गट अ 

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता  विभाग मध्ये  खालील दोन पदांसाठी परीक्षा होते-

सहाय्यक कार्यकारी अभियंता- गट अ (स्थापत्य)  

सहाय्यक अभियंता- गट अ (स्थापत्य)  

 

पात्रता:

स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी पूर्ण केलेली हवी. शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतो मात्र , मुख्य परीक्षेपर्यंत अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. 

 

परीक्षेचे स्वरूप:

परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन पातळींवर घेतली जाते. 

 

पूर्व परीक्षा

पूर्व परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी या विषयावर परीक्षा होते. १०० प्रश्न १०० गुणांसाठी विचारले जातात. परीक्षेचा दर्जा पदवी च्या पातळीचा असतो. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. 

मुंबई, औरंगाबाद नागपूर पुणे या चार केंद्रांवर परीक्षा  घेण्यात येते. 

 

मुख्य परीक्षा - लेखी ७५० गुण आणि मुलाखत १०० गुण अशी एकूण ८५० गुणांची असते. 

 

लेखी परीक्षेत चार विषय असतात. 

१. मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन - १५० प्रश्न १५० गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 

२. स्थापत्य अभियांत्रिकी १- २०० गुण 

३. स्थापत्य अभियांत्रिकी २- २०० गुण 

४. स्थापत्य अभियांत्रिकी ३- २०० गुण 

 

स्थापत्य अभियांत्रिकी चे विषय दीर्घोत्तरी स्वरूपाचे असतात. मराठीचा दर्जा बारावी तर इंग्रजी आणि सामान्य अध्ययन विषयांचा दर्जा पदवी परीक्षेचा असतो. अभियांत्रिकीच्या विषयांचा दर्जा पदवि चा असतो. 

 

गट ब

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता  विभाग मध्ये  सहाय्यक अभियंता- गट ब (स्थापत्य) या पदांसाठी परीक्षा होते.  

 

पात्रता:

 

स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी. शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतो मात्र , मुख्य परीक्षेपर्यंत अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. 

 

परीक्षेचे स्वरूप:

 

परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन पातळींवर घेतली जाते. 

 

 

पूर्व परीक्षा

पूर्व परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी या विषयावर परीक्षा होते. १०० प्रश्न १०० गुणांसाठी विचारले जातात. परीक्षेचा दर्जा पदवी च्या पातळीचा असतो. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. 

मुंबई, औरंगाबाद नागपूर पुणे या चार केंद्रांवर वारीक्षा घेण्यात येते. 

 

मुख्य परीक्षा - लेखी ५५० गुण आणि मुलाखत ७५ गुण अशी एकूण ६२५ गुणांची असते. 

 

लेखी परीक्षेत चार विषय असतात. सर्व विषय वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. 

१. मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन - १५० प्रश्न १५० गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 

२. स्थापत्य अभियांत्रिकी १- १०० प्रश्न -२०० गुण 

३. स्थापत्य अभियांत्रिकी २- १०० प्रश्न -२०० गुण 

 

मराठीचा दर्जा बारावी तर इंग्रजी आणि सामान्य अध्ययन विषयांचा दर्जा पदवी परीक्षेचा असतो. अभियांत्रिकीच्या विषयांचा दर्जा अभियांत्रिकी पदवीचा असतो. 

 

अभ्यास कसा कराल?

मराठी आणि इंग्रजी व्याकरणाची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.  प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना उपयुक्त अशी पुस्तके उपयुक्त आहेत. सामान्य अध्ययनासाठी चालू घडामोडी आणि भारतीय इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल यांची बाजारात उपलब्ध असणारीन्स्पर्धा परीक्षांची पुस्तकेघ्यावीत . 

 

अभियान्त्रीकि विषयाचा  अभ्यास तुमच्या पदवी परीक्षेतूनच करावा. गट ब परीक्षेतील प्रश्न बहुपर्यायी असल्याने तेप्रष्ण  विचारले जातात याचा अंदाज येण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका  पहाव्यात. दिल्ली तील क्लासेसच्या नोट्स सुध्दा मिळू शकतात. नेट वरून या क्लासेसच्या दूरस्थ शिक्षण व्यवस्थेची माहिती घेता येईल. 

 

तेंव्हा अभियांत्रिकी झाल्यावर हातात पदवीचे गुंडाळे घेऊन चारचौघांसारखे नोकरीच्या बाजारात फिर्ण्याप्र्क्षा एक प्रशासकीय परीक्षा देऊन सज्ज  व्हा महाराष्ट्र शासनातील प्रतिष्ठित पदांसाठी!!

 

bottom of page