top of page

स्टेट बँक आणि सहयोगी बँका 

स्टेट बँक ऑफ इंडिया तिच्या आणि इतर स्टेट बँकासाठी स्पर्धा परीक्षा मार्फत भरती करते.

 

स्टेट बँकेची परीक्षा हि इतर बँकांसाठी आयबीपीएस परीक्षांहून वेगळी असते. 

स्टेट बँक तीन पदांसाठी भरती करते:

१. क्लार्क 

२. प्रोबेशनरी ऑफिसर  

३. स्पेशलाइज्ड ऑफिसर्स 

क्लार्क आणि प्रोबेशन ऑफिसर्स पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता कुठच्याही विषयातील पदवी हि आहे. 

 

क्लार्क:

वयोमर्यादा: २१ ते २८ वर्षे 

 

परीक्षेचे स्वरूप 

क्लार्क:

१. इंग्रजी 

२. बुद्धिमत्ता चाचणी 

३. गणित 

४. सामान्य ज्ञान विशेषतः बँकिंग क्षेत्राशी संबंधित 

५. आणि संगणक 

यानंतर मुलाखत घेण्यात येते. 

 

प्रोबेशनरी ऑफिसर्स परीक्षा:

वयोमर्यादा: २१ ते ३० वर्षे 

परीक्षेचे स्वरूप:

१. पूर्व परीक्षा:

अ) इंग्रजी 

ब)  बुद्धिमत्ता चाचणी 

क) रिझनिंग

या तिन्ही घटकांवर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे १०० प्रश्न विचारले जातात. १०० गुणांच्या परीक्षेला १ तासाचा कालावधी असतो. 

मुख्य:

पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यारांना मुख्य परीक्षेस बसता येते. 

मुख्य परीक्षेसाठी २०० गुणांचे वस्तुनिष्ठ आणि ५० गुणांचे दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातात. 

वस्तुनिष्ठ:

१. इंग्रजी 

२. सामान्य ज्ञान मार्केटिंग आणि संगणक 

३. डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन 

४. रीसनिंग 

दीर्घोत्तरी:

इंग्रजी भाषा- निबंध आणि पत्रलेखन 

यानंतर २० गुणांसाठी गटचर्चा आणि ३० गुणांची मुलाखत घेतली जाते. 

मुख्य लेखी परीक्षेतील आणि गटचर्चा आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून त्याप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाते. 

 

स्टेट बँक स्पेशलाइज्ड ऑफिसर्स 

बँकांना केवळ क्लार्क आणि मेनेज्मेंत ट्रेनी नव्हे तर विशेष प्राविण्य असणार्या अधिकाऱ्यांची सुद्धा गरज असते. बँकांच्या वाढत्या व्यापानुसार या अधिकाऱ्यांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. 

सनदी अधिकारी, कायदा अधिकारी, अभियांत्रिकी अधिकारी, तांत्रिकी अधिकारी, अर्थतज्ज्ञ, राजभाषा अधिकारी या विशेष तज्ज्ञांची आवश्यकता बँकेला भासते. 

 

यासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षेद्वारेच भरती केली जाते. अधिकाऱ्यांच्या पदाप्रमाणे अनुभव आणि वयोमर्यादा बदलते. 

परीक्षेचे स्वरूप:

१. रिझनिंग ५० गुण 

२. बुद्धिमत्ता चाचणी- ३५ गुण 

३. इंग्रणी ३५ गुण 

४. विशेष प्राविण्याचे क्षेत्र- १०० गुण 

 

bottom of page