top of page
 महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 

महाराष्ट्रात विविध जिल्हे आणि ताल्कुक्यांमध्ये कृषी  योजना बनवणे आणि राबवणे यासाठी कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. या अधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा या द्वारे केली जाते. सदर परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेते. 

 

पात्रता: बीएस्सी (कृषी, वनशास्त्र, फलोत्पादन किंवा बीटेक (कृषी अभियांत्रिकी). पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेले विद्यार्थी सुद्धा परीक्षेस पात्र असतील, मुख्य परीक्षेपर्यंत पदवी पूर्ण करणे आवश्यक ठरते. 

 

परीक्षेचे स्वरूप:

परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. 

१. पूर्व परीक्षा- २०० गुण 

२. मुख्य परीक्षा- ६०० गुण  आणि 

३. मुलाखत -७५ गुण 

 

परीक्षेचे स्वरूप:

पूर्व परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असते. 

१. मराठी - ३५ प्रश्न, ३५ गुण 

२. इंग्रजी -३५ प्रश्न ३५ गुण 

३. सामान्य अध्ययन - ८० प्रश्न ८० गुण 

४. कृषीविषयक घटक - ५० प्रश्न ५० गुण 

 

अशी एकूण २०० गुणांची परीक्षाहोते एकूण कालावधी दोन तास असून परीक्षा वस्तुनिष्ठ-बहुपर्यायी  स्वरुपाची असते. 

 

मराठी मध्ये सर्वसामान्य शब्दसमूह, वाक्यरचना, म्हणी आणि वाक्प्रचार, व्याकरण आणि उतार्यावरील  यावर प्रश्न विचारले जातात. 

 

इंग्रजी विषयामध्ये शब्द वाक्यरचना , व्याकरण, उतार्यावरील प्रश्न विचारले जातात. 

 

सामान्य अध्ययनात, भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान महाराष्ट्रातील समाजसुधारक, संगणक तंत्रज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी यावरील प्रश्न विचारले जातात. 

 

कृषी घटक परीक्षेमध्ये, १)जमिनीचा वापर आणि मुख्य पिके, २) सिंचन पद्धती आणि स्रोत, ३. पशुपालन आणि दुघ्द्व्यावासाय, फलोत्पादन आणि वनोत्पादन, मत्स्यव्यवसाय आणि कृषी अर्थशास्त्र यावर प्रश्न विचारले जातात .

 

मुख्य परीक्षा:

 

मुख्य परीक्षेमध्ये दोन विषय असतात. हे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात

१. कृषी विज्ञान- १०० प्रश्न २०० गुण. या परीक्षेचे काठीण्य कृषी पदवी च्या पातळीचे असते . यासाठी एक तास कालावधी असतो. 

२. कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी या विषयातून एक वैकल्पिक विषय निवडायचा असतो.  यात २०० प्रश्न ४०० गुणांसाठी विचारले जातात. प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी त्या त्या विषयाच्या पदवी परीक्षेच्या पातळीतुल्य असते. 

 

bottom of page