top of page

तुम्हाला उद्योजक व्हायचंय?

प्रबोधक आनंदाने तुम्हाला मदत करेल…

 

मी उद्योग का करावा?

 

१. उद्योग म्हणजे संजीवनी आहे. तुम्ही तुमचे आर्थिक आणि सामाजिक कल्याण करताना इतरांनाही रोजगार देऊन समाजाची केलेली उतराई असा दुहेरी फायदा आहे उद्योगाचा. 

२. स्वयंरोजगारात तुमच्या मेहनतीचा आणि तुमच्या उत्पन्नाचा थेट संबंध असतो जो नोकरीत नाही.

३. उद्योगात तुम्ही स्वतःचे पोट भरता असे नाही, तर तुमच्या उद्योगात काम करणारी माणसे, तुमच्यावर अवलंबून असणारे उद्योग आणि त्यात काम करणारी माणसे त्यांचे कुटुंब सर्वांचे पोट भरता.

४.  तुम्ही उद्योजक होऊन तुमच्या समाजाच्या, देशाच्या आर्थिक विकासात थेट सहभाग नोंदवता. ५. किंबहुना तुमच्या प्रगतीला काही मर्यादा नसतातच मुळी!

६.  नोकरीत तेच तेच काम रोज करावे लागते, उद्योगात तुमच्या कल्पकतेला आणि तुमच्या मेहनतीला आभाळ खुजे असते. 

 

आज मोठे मोठे उद्योग अनेकविध उद्योगक्षेत्रात कार्यरत आहेत. एका माणसाच्या स्वप्नांना आज ७०,००० कोटींचे स्वरूप प्राप्त झाले आहे, लाखो माणसांचे पोट भरत आहे, हे कुठल्याही नोकरीत शक्य नाही. 

 

तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही तुमचे राजे आणि तुम्हीच तुमचे मालक. शिवाय, आजूबाजूच्या संसाधनांचा एवढा सुंदर वापर कुठे करायला मिळणार?

 

"तेव्हा हे महाराष्ट्र बांधवा, 'प्रबोधक' आपले दोन्ही हात पसरवून तुला विनंती करीत आहे, कि ९.०० ते ६.०० च्या कामाच्या जोखडातून मुक्त हो, दर महिना आकडी पगाराची संकुचित आस सोड, आणि उद्योजकतेची कास धर,बघ! तुला भरभरून पैसेही मिळतील आणि महत्वाचे म्हणजे कामातील समाधान… "

 

 

                                      सहज करता येण्याजोग्या उद्योगांच्या कल्पना...

उत्तिष्ठत | जाग्रत ।        

प्रबोधक- महाराष्ट्र उद्योग पुस्तिका

उद्योगांची नोंदणी कशी करावी? उद्योग नोंदणी 

 

उद्योगासाठी प्रशिक्षण 

कुठे घ्याल?

 

bottom of page