top of page
भारतीय वनसेवा परीक्षा 

महाराष्ट्राप्रमाणेच केंद्र शासन सुद्धा वन परीक्षा घेते. वनस्पती शास्त्र, कृषी, गणित  रसायन शास्त्र, भूशास्त्र, सांख्यिकी प्राणीशास्त्र, भौतिक शास्त्र उद्यानविद्या या विषयातील पदवीधर या परीक्षेस बसू शकतात. त्याचबरोबर किमान शारीरिक क्षमता असणे आवश्यक असते.

 

याची पूर्वपरीक्षा ही केंद्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेबरोबरच होते.

 

मुख्य परीक्षा: 

मुख्य परीक्षा १४०० गुणांची असते. मुख्य परीक्षा दीर्घोत्तरी स्वरुपाची असते. 

 

१. इंग्रजी-  ३०० गुण 

२. सामान्य अध्ययन ३०० गुण 

३. दोन वैकल्पिक विषय- २०० गुण प्रत्येकी  

 

त्यामुळे कृषी किंवा इतर विषयात पदवीधर झालेल्यांनी  चाकोरीबद्ध क्षेत्रांचा विचार न करता,  प्रशासकीय सेवांचा विचार नक्की करावा. या पदांमध्ये खूप प्रतिष्ठा आहे, पैसा आहे आणि आपल्या क्षेत्रात भरीव असे कार्य करून  दाखवण्याची संधी सुद्धा!

 

bottom of page