top of page

 

रिझर्व बँकेतील संधी

रिझर्व बँक म्हणजे सर्वोच्च बँक, किंवा बँकांची बँक. भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणे, भारताच्या आर्थिक आणि चलनविषयक धोरण ठरवणे आणि त्याचे पालन करणे, बँका आणि इतर आर्थिक संस्थांचे कामकाज पाहणे आणि कायदे पाळले न गेल्यास शिक्षा करणे हि रिझर्व बँकेची कामे. याहूनही अधिक म्हणजे, देशातील परकीय गंगाजळीचे नियंत्रण आणि नियमन, विविध बँक आणि कर्ज रोखे, शासनाचे आर्थिक व्यवहार आणि कर्जे, परकीय चलनाचे चलनवलन,  विनिमय दर यांचे नियमन हि कामे रिझर्व बँक करते. 

 

बँकेचे मुख्यालय मुंबई येथे असून देशभरात तिची कार्यालये आहेत. बँकेच्या अतिसंवेदनशील जबाबदार्या पार पाडण्यासाठी बँकेला तज्ज्ञ मनुष्यबळाची नेहमीच आवश्यकता लागते. बँकेत काम करायला मिळणे हीच एक सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे आर्थिक,  वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयात आवड असणार्या विद्यार्थ्यांना आणि इतरही अनेक तंत्रज्ञांना रिझर्व बँकेत काम करण्याचे फार मोठे क्षेत्र खुले आहे. 

 

रिझर्व बँक 

रिझर्व बँक हि बँकांची बँक आणि शासनाची बँक. सर्व शासकीय व्यवहार थेट रिझर्व बँकेतून चालतात. देशातील बँकांवर आणि एकूण बँकिंग क्षेत्रावर रिझर्व बँकेचेच नियंत्रण असते. परकीय गंगाजळी वर रिझर्व बँकेचे नियंत्रण असते. 

 

बँकेचे मुख्यालय मुंबईत असून देशभरात विविध ठिकाणी बँकेची कार्यालये आहे. 

 

रिझर्व बँकेतील भरती:

रिझर्व बँकेतील भरतीचे आपण दोन भागात विभाजन करू शकतो:

१. थेट भरती 

२.  विशेषज्ञांची भरती 

 

रिझर्व बँकेद्वारे स्पर्धा परीक्षा घेऊन अधिकाऱ्यांची थेट भरती केली जाते. यात खालील पदांचा समावेश असतो:

१. सहाय्यक 

२. ऑफिसर्स ग्रेड- ब 

३. रिसर्च ऑफिसर्स 

४. तांत्रिक भरती 

५. खेळाडू 

 

१. सहाय्यक 

पदवीधरांसाठी रिझर्व बँकेत शिरण्यासाठी हा  उत्तम पर्याय आहे. 

शैक्षणिक पात्रता: कुठल्याही विषयात पदवी (५०%)

वयोमर्यादा: २१ ते २८ वर्षे 

भरती स्पर्धा परीक्षेमार्फत केली जाते.  

 

२. ऑफिसर्स ग्रेड- ब 

अधिक उच्चशिक्षितांसाठी हि पदे असतात. 

वयोमर्यादा: २१ ते ३० वर्षे (एमफील व पीएचडी असल्यास २१-३३ वर्षे)

शैक्षणिक पात्रता: पदवी (६०%) किंवा पदव्युत्तर पदवी (५५%) किंवा सीए, सीएस, सीडब्ल्यूए आणि पदवी किंवा एमबीए/ व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका.   

भरती स्पर्धा परीक्षेमार्फत केली जाते. 

 

कायदा अधिकारी- ऑफिसर्स ग्रेड ब 

 

वयोमर्यादा: २१ ते ३० वर्षे (एमफील व पीएचडी असल्यास २१-३३ वर्षे)

शैक्षणिक पात्रता: कायद्यातील पदवी (५०%) 

अनुभव: वकील/ कायदा अधिकारी म्हणून २ वर्षे. 

भरती स्पर्धा परीक्षेमार्फत केली जाते. 

 

राजभाषा 

केंद्र शासनाच्या आस्थापनामध्ये राजभाषा (हिंदी) ऑफिसर्स असतात. तशी रिझर्व बँकेतही भरती होते. बँकेतील विविध नोटीस, पत्रे आणि इतर लिखित कागदपत्रे हिंदी मध्ये बनवणे व रुपांतरीत करणे हे या अधिकार्याचे काम असते. 

असिस्टंट मेनेजर ग्रेड अ 

हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी हा पदवी मधील एक विषय किंवा दोन्ही मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर आणि हिंदी किंवा इंग्रजी पदवी परीक्षेतील एक विषय. 

साधारण तीन वर्षांचा अनुभव असलेल्यांना या पदासाठी ग्राह्य धरले जाते.  

 

३. संशोधन

रिसर्च ऑफिसर्स- ग्रेड ब 

शैक्षणिक पात्रता:  पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र/ संख्याशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र इ- ज्या विषयासाठी संशोधक हवे असतील)(५५%) किंवा पीएचडी 

वयोमर्यादा: २१ ते ३० वर्षे (एमफील व पीएचडी असल्यास २१-३३ वर्षे)

भरती स्पर्धा परीक्षेमार्फत केली जाते. 

 

स्पेशालिस्ट एडवायझर्स (रिसर्च) ग्रेड फ 

अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी (६०%) आणि पीएचडी आणि संशोधनाचा अनुभव 

 

४. तांत्रिक भरती 

१) मेनेजर (सिव्हिल) ग्रेड ब 

सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी (सर्व सेमिस्टर सरासरी ६०%) आणि तीन वर्षांचा अनुभव. 

२) मेनेजर (इलेक्ट्रिकल) ग्रेड ब 

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील पदवी (सर्व सेमिस्टर सरासरी ६०%) आणि तीन वर्षांचा अनुभव. 

३) ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल)

सिव्हिल/इलेक्ट्रिकल मधील ३ वर्षांचा डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव 

  

५. खेळाडू 

रिझर्व बँक खेळाडूंची भरती करते. क्रिकेट, फुटबॉल, बेडमिन्टन, केरम अशा खेळाडूंची भरती होते. देश, राज्य, जिल्हा, आंतरविद्यापीठ किंवा आंतरशालेय स्पर्धांमध्ये खेळलेल्या खेळाडूंना हि संधी मिळते. 

 

हि भरती दोन पदांसाठी होते 

१. ऑफिस अटेंडन्ट- दहावी 

२. सहाय्यक- पदवी 

 

इंटरनशिप

या व्यतिरिक्त रिझर्व बँक इंटरनशिप साठी सुद्धा अर्ज स्वीकारते. 

एक्झीक्युतीव्ह इंटरन 

रिझर्व बँक प्रमाणे या पदासाठी अर्ज मागवते. 

शैक्षणिक पात्रता: पदवी (६०%)

वयोमर्यादा: २१ ते ३० वर्षे 

 

उन्हाळी इंटरनशिप 

कायदा, अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी करणारे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थांमार्फत रिझर्व बँकेत अर्ज करू शकतात. 

 

तेंव्हा सामान्य नोकरी न करता, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संरक्षकाबरोबर नोकरी करण्याची स्वप्न असतील तर रिझर्व बँकेत तुमचे स्वागत आहे.   

bottom of page