top of page

           

भारतीय आर्थिक सेवा परीक्षा आणि

भारतीय संख्या सेवा परीक्षा 

बर्याचदा अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र पदव्युत्तर पदवी  केलेल्या विद्यार्थ्यांना असे वाटते कि पीएचडी करून प्राध्यापक होणे किंवा संशोधनात जाणे किंवा एखाद्या संस्थेत अर्थतज्ज्ञ म्हणून लागू होणे हेच करिअर आहे असे वाटते. मात्र  अतिशय वेगळे असे प्रतिष्ठित प्रशासकीय सेवा करिअर तुमची वाट पाहत उभे आहे याची जाणीवच  नस्ते. आता आपण त्याच प्रशासकीय सेवेची माहिती घेऊयात-भारतीय आर्थिकि  / सांख्यिकी सेवा 

 

अर्थशास्त्रात किंवा संख्याशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलेल्यांना हि परीक्षा  येते.त्या किमान  नस्ते.  अर्थशास्त्र केलेल्या विद्यार्थ्यांन आर्थिकि तर संख्याशास्त्र केलेल्या विद्यार्थ्यांना सांख्यिकी सेवेला बसता येते. या सेवांची पातळी भारतीय प्रशासकीय सेवांच्या खालोखाल येते. अर्थात या परीक्षांना प्रतिष्ठाही आहे आणि उत्तम करिअरची संधीसुद्धा. त्यामुळे या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रातून वाढणे आवश्यक  आहे. 

 

नोक्र्री 

भारतीय  आर्थिक आणि सांख्यिक अधिकाऱ्यांचे महत्व वादातीत आहे. अगोदरचे नियोजन आयोग आणि  नीती आतोग, महाराष्ट्र आणि केंद्र शासनाचे  वित्त मंत्रालय तसेच विविध आर्थिक संस्था यामध्ये आर्थिक सेवा अधिकार्यांना पदे मिळतात देशाच्या विविध सांख्यिकी माहिती गोळा करणाऱ्या संस्थांमध्ये जसे सेन्ट्रल स्तेतीस्तीकाल ओर्गानायझेषण मध्ये सांख्यिकी आदिकार्यांना पदे मिळतात. हि सर्व पदे जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची असतात. 

 

परीक्षेसाठी पात्रता  

 हि परीक्षा साधारणतः मे  महिन्यामध्ये घेण्यात येते. अर्ज मार्च मध्ये निघतात. या वर्षीची परीक्षा २३ मे ला सुरुहोत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च आहे

 

शैक्षणिक पात्रता

आर्थिक सेवा- अर्थशास्त्र/अप्लाइड अर्थशास्त्र/बिझनेस अर्थशास्त्र/ इकोनोमेट्रीक्स या विषयात पदव्युत्तर पदवी 

सांख्यिकी सेवा- संख्याशास्त्र/गणित घेऊन पदवी किंवा संख्याशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी 

 

वय-२१ ते ३० वर्षे अनुसूचित जातीजमाती आणि इतर मागासवर्गीयांना वयात सूट  मिळते. 

परीक्षेसाठी मुंबई हे केंद्र आहे. मात्र केंद्र पहिले अर्ज या तत्वावर देण्यात येते. त्यामुळे एखादे केंद्र पूर्ण भरलेअसल्यास दुसरेकेंद्र देण्यातयेईल . 

 

ओन्लाइन अर्ज- upsconline.nic.in 

 

परीक्षेचे स्वरूप 

आर्थिकी सेवा 

यात सहा पेपर्स असतात 

पेपर १ इंग्रजी १०० गुण ३ तास 

पेपर २  सामान्य ज्ञान १०० गुण ३ तास 

पेपर ३ अर्थशास्त्र १ २०० गुण ३ तास 

पेपर ४ अर्थशास्त्र २ २०० गुण ३ तास 

पेपर ५ अर्थशास्त्र ३ २०० गुण ३ तास

पेपर ६ भारतीय अर्थव्यवस्था २०० गुण ३ तास

 

पेपर १ इंग्रजी

यामध्ये निबंध,इंग्रजी शब्दांचे अर्थ, इंग्रजी उतार्यावरील अर्थ यावर प्रश्न विचारले जातात. 

 

पेपर २  सामान्य ज्ञान

दैनंदिन घटनांवर  आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. 

 

पेपर ३ अर्थशास्त्र  १ 

हा पेपर  मायक्रो इकोनोमिक्स आणि सांख्यिकी गणितीय अर्थशास्त्र या विषयावर असतो.  भाग १ मध्ये मायक्रो अर्थशास्त्रावर प्रश्न विचारले जातात. भाग २ हा गणितीय आणि सांख्यिकी अर्थशास्त्रावर असतो. 

 

पेपर ४ अर्थशास्त्र २ 

हा पेपर मायक्रो इकोनोमिक्स विषयावर आधारित असतो. 

 

पेपर ५ अर्थशास्त्र ३

 ह्या पेपर मध्ये पब्लिक अर्थशास्त्र, पर्यावरणीय अर्थ्शास्त्र, आणि इन्दस्त्रिअल अर्थशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जातात. 

 

पेपर ६ भारतीय अर्थव्यवस्था 

नावाप्रमाणेच भारतीय अर्थशास्त्र विषयावरील विविध घटकांवर प्रश्न विचारले जातात. 

 

सांख्यिकी सेवा 

यात सहा पेपर्स असतात 

पेपर १ इंग्रजी १०० गुण ३ तास 

पेपर २  सामान्य ज्ञान १०० गुण ३ तास 

पेपर ३ संख्याशास्त्र  १ २०० गुण ३ तास 

पेपर ४ संख्याशास्त्र २ २०० गुण ३ तास 

पेपर ५ संख्याशास्त्र ३ २०० गुण ३ तास

पेपर ६ संख्याशास्त्र ४ २०० गुण ३ तास

 

यामध्ये इंग्रजी आणि सामान्य ज्ञानाचे पेपर्स सामायिक असतात. 

 

पुढील चार पेपर्स हे संख्याशास्त्रावर आधारित असतात. 

यामध्ये संख्याशास्त्र पदव्युत्तर पातळीचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रोबाबिलीती, लिनिअर प्रोग्रामिंग, कोम्पुतर अनालिसिस, डेटा मेनेज्मेंत अशा विविध विषयांवर प्रश्न असतात. 

 

वर  नमूद केल्याप्रमाणे इंफ्राजी आणि सामान्य ज्ञानावरील प्रश्न पदवी स्तराचे तर विशेष विषयांवरील प्रश्न पद्वुत्तर पातळीचे असतात. त्यामुळे पदव्युत्तर  केलेल्यांना हि परीक्षा तुलनेने सोप्पी पडते. महाराष्ट्रातून जास्त  चोखाळले न गेलेले हे करिअर आहे. तेंव्हा पुढे या आणि भारतीय प्रशासनाचे आर्थिक आणि सांख्यिकी अधिकारी बना!

 

 

bottom of page