top of page

          केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षा 

आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि इतर 

मराठी तरुणांचे या परीक्षांना बसण्याचे प्रमाण फारच नगण्य आहे. त्यामुळे भारताच्या प्रशासकीय सेवांमध्ये मराठी टक्का कमी आढळतो. याचा परिणाम हा होत कि देशाच्या निर्णय यंत्रणेत महाराष्ट्राचा वाटा कमी असतो. त्यामुळे केंद्रात महाराष्ट्राचा आवाज तोकडा पडतो. महाराष्ट्राच्या प्रश्नांना केंद्रात बगल दिली जाते. या उलट ज्या उत्तर भारताचे प्रमाण उत्तीर्ण होणार्या मुलांमध्ये अधिक असते आणि पर्यायाने प्रशाकीय अधिकार्यांमध्ये जास्त असते, त्या उत्तर राज्यांना केंद्र पातळीवर अधिक स्थान प्राप्त होते. हे कितीही अमान्य केले किंवा नाकारले तरी सत्य आहे .
 

याच करिता अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षेकडे गांभीर्याने पहिले पाहिजे. इतर अभ्यास करताना किंवा नोकरी करता करता देण्याची हि परीक्षा नव्हे.प्रचंड शिस्तीने अभ्यास करून हि परीक्षा देणे उत्तम आहे.

 

शैक्षणिक अर्हता:

कुठलीही पदवी  झालेला किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेला( परीक्षा देऊन निकालाची प्रतीक्षा करीत असलेला) विद्यार्थी सदर परीक्षेस बसू शकतो.वयोमर्यादा:खुल्या गटासाठी वयोमर्यादा २१ ते ३२ वर्षे आहे तर मागर्वर्गीय वर्गासाठी ३५ आणि एससी-एसटी वर्गासाठी ३७ वयोमर्यादा आहे.प्रयत्नखुल्या वर्गातील परीक्षार्थी परीक्षेचा ६ वेळा प्रयत्न करू शकतो.

खालील सेवांसाठी हि परीक्षा घेतली जाते:-

१. Indian Administrative Service. 

२. Indian Foreign Service. 

३. Indian Police Service. 

४. Indian P & T Accounts & Finance Service, Group ‘A’. 

५ Indian Audit and Accounts Service, Group ‘A’. 

६.Indian Revenue Service (Customs and Central Excise), Group ‘A’.

७.Indian Defence Accounts Service, Group ‘A’. 

८.  Indian Revenue Service (I.T.), Group ‘A’. 

९.  Indian Ordnance Factories Service, Group ‘A’ (Assistant Works Manager, Administration). 

१०. Indian Postal Service, Group ‘A’. 

११. Indian Civil Accounts Service, Group ‘A’. 

१२. Indian Railway Traffic Service, Group ‘A’. 

१३.  Indian Railway Accounts Service, Group 'A'.

१४.  Indian Railway Personnel Service, Group ‘A’. 

१५.  Post of Assistant Security Commissioner in Railway Protection Force, Group ‘A’ 

१६. Indian Defence Estates Service, Group ‘A’. 

१७.  Indian Information Service (Junior Grade), Group ‘A’. 

१८.  Indian Trade Service, Group 'A' (Gr. III). 

१९. Indian Corporate Law Service, Group "A". 

२०.  Armed Forces Headquarters Civil Service, Group ‘B’ (Section Officer’s Grade).

२१.  Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Civil Service, Group 'B'. 

२२.  Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Police Service, Group 'B'. 

२३. Pondicherry Civil Service, Group 'B'.

 

-----------------

प्रशासकीय सेवा:

किमान पात्रता: पदवी

वयोमर्यादा : २१ ते ३२ वर्षे मागासवर्गीय वर्गासाठी ३५- एससी-एसटी वर्गासाठी ३७ वयोमर्यादा आहे.

प्रयत्न:- खुल्या वर्गातील परीक्षार्थी परीक्षेचा ६ वेळा प्रयत्न करू शकतो.इतर मागासवर्गीय- ९ आणि अनुसूचित जाती जमाती- मर्यादा नाही. 

----------------------

परीक्षेचे स्वरूप

१.पूर्व परीक्षा- 

    पेपर १- सामान्य ज्ञान- २०० गुण 

    १०० प्रश्न- २ गुण- ३ चुकीच्या उत्तरांना १ गुण वजा.  

विषय:

अ)चालू घडामोडी-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय,                    

ब) भारतीय इतिहास व भारतीय स्वातंत्र्यलढा                    

क) भूगोल- भारत व जगाचा                    

ड़) भारतीय राज्यघटना, राज्यतन्त्र आणि शासन                    

इ) अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास                    

फ) पर्यावरण                    

ज) सामान्य विज्ञान

 

पेपर २- बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी- २०० गुण 

 ८० प्रश्न

 

मेन्स 

प्रिलिम्समध्ये 'कट ऑफ' पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी मेन्स साठी पत्र होतात. 

मेन्स २०२५ मार्कांची परीक्षा असते. 

 

१. भारतीय भाषा (दिलेल्या यादीतून)-  ३०० गुण 

२.  इंग्रजी- ३०० गुण 

३. निबंध - २५० गुण 

४. सामान्य ज्ञान १   - २५० गुण

     (इतिहास, संस्कृती आणि भूगोल)

५. सामान्य ज्ञान २   -२५० गुण

    (राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध)

६. सामान्य ज्ञान ३    - २५० गुण

    (तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, जैवविविधता इ)

७. सामान्य ज्ञान ४   -२५०  गुण

(नैतिकता, व्यक्तिमत्व इ)

८.  वैकल्पिक विषय पेपर १-  २५०  गुण

९.  वैकल्पिक  विषय पेपर २- २५०  गुण

                        -------------------------

                                    १७५०  गुण

   मुलाखत                       २७५ गुण

--------------------------------------------------

                                      २०२५ गुण 

=============================

- हि परीक्षा दीर्घोत्तरी असते. 

- भारतीय भाषा दिलेल्या यादीतून निवडायची असते. एकूण २२ भाषा उपलब्ध आहेत.भारतीय भाषा आणि इंग्रजी चे विषय केवळ उत्तीर्ण होण्यासाठी (क्वालीफायिंग) असतात. एकूण गुणांमध्ये ते धरले जात नाहीत. भारतीय भाषेत किमान ३०% आणि इंग्रजीत किमान २५% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यानंच इतर विषयांच्या गुंपात्रीकांसाठी ग्राह्य धरले जाते. या पेपर्सची काठीण्यपातळी दहावीच्या पातळीची असते. 

- सामान्य ज्ञानाचे चार पेपर्स असतात.

- दिलेल्या यादीतून एक वैकल्पिक विषय विद्यार्थ्याला निवडावा लागतो. एकूण ३० विषय यादीत दिलेले आहेत. एका विषयाचे दोन पेपर्स होतात. 

- भाषा आणि इंग्रजी वगळता, इतर विषयांचे पेपर्स परीक्षार्थी कुठल्याही भाषेतून देऊ शकतो.

       ----------------------------------------------------------

आपल्या मराठी मध्ये एक म्हण आहे, 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट!'. या प्रमाणे हि परीक्षा न दिलेली आणि त्याविषयी काहीही माहिती नसलेली माणसे अतिशय चुकीची माहिती पदवीधरांना देतात, आणि त्यांना या परीक्षेविषयी घाबरवतात. या परीक्षेचा बागुलबुवा केल्यामुळेच अनेक विद्यार्थी परीक्षेस बसत नाहीत. 

 

त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो, कि जर तुम्ही पदवीधर आहात, या वर्षी पदवीधर होता आहात आणि तुमचे वय वयोमर्यादेत बसत आहे, तर या परीक्षेचा प्रयत्न द्याच. आणि आदर्श पद्धतीने, एक वर्ष पूर्ण अभ्यास करून या परीक्षेचा प्रयत्न द्या. 

 

परीक्षेच्या अभ्यासासाठी काहीही मदत लागल्यास प्रबोधक तुमच्या पाठीशी आहे.

ध्येय एकच! 

यावर्षी प्रशासकीय अधिकारी व्हायचेच!

यु पी एस सीत मराठी टक्का अजूनही कमी का?

bottom of page