top of page

                               दहावी बारावी नंतरच्या प्रवेश परीक्षा 

 

दहावी/ बारावी नंतर तसेच पदवी नंतर विविध शैक्षणिक कोर्सेससाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मराठी मुलांना ह्या परीक्षा माहीतच नसल्यामुळे किंवा उशिरा समजल्याने त्याची तयारी केली जात नाही आणि दुर्दैवानं कितीतरी मराठी मुले यासाठी बसत नाहीत. बहुतांशी परीक्षांची तयारी दहावी किंवा त्याआधीच करावी लागते. 

 

या प्रवेश परीक्षांची माहिती मुलांना आणि पालकांना असावी याकरिता प्रवेश परीक्षांची यादी माहितीसहित देत आहोत. 

image.png

बारावीनंतर


१. एनडीए (सैन्य प्रवेशाकरिता) 

(वर्षातून दोन वेळा परीक्षा होते. बारावीच्या परीक्षेआधी पहिली परीक्षा येते)

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)

वयोमर्यादा: १६ वर्षे ६ महिने ते १९ वर्षे ६ महिने

शैक्षणिक पात्रता: आर्मी : १२ वी उत्तीर्ण (आर्मी) 

              आणि नेव्ही आणि एअरफोर्स: १२ वी गणित आणि फिजिक्स सहित उत्तीर्ण  

 

परीक्षेचे स्वरूप: 

i) गणित (३०० गुण) आणि 

ii) सामान्य क्षमता चाचणी (इंग्रजी २०० गुण आणि सामान्य ज्ञान ४०० गुण)  (६०० गुण)

 

परीक्षा दिन: वर्षातून दोन वेळेस होते. पहिली एप्रिल च्या सुमारास (जानेवारीमध्ये प्रवेश अर्ज) आणि दुसरी नोव्हेंबर च्या सुमारास (सप्टेंबर मध्ये प्रवेश अर्ज)

 

२. वैद्यक पदवीसाठी 

 

२.१. नीट 

खासगी, शासकीय आणि अभिमत विद्यापीठांमध्ये देशभरातील प्रवेशासाठी नीट हि एक परीक्षा घेतली जाते. २०१३ पासून (२०१४ आणि २०१५ मध्ये राज्याची सीईटी परीक्षा आल्यानंतर २०१६ पासून पुन्हा) नीट परीक्षा मेडिकल प्रवाशांसाठी घेतली जाते. एमबीएस बीडीएस साठी हि प्रवेश परीक्षा होते. १२वी विज्ञान किमान ५०% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असते. 

 

१ पेपर :तीन तास कालावधी 

१८० प्रश्न: ७२० गुणांची परीक्षा 

फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये ४५ प्रश्न आणि बायोलॉजी मधील ९० प्रश्न असतात. प्रश्न एनसीईआरटी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. 

परीक्षा मे च्या सुमारास होते आणि त्यासाठी प्रवेश अर्ज नोव्हेंबर च्या सुमारास भरले जातात. 

नीट वरच आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेज पुणे येथे सुद्धा प्रवेश मिळतो. 

२.२. एम्स (AIIMS)

भारतात सात एम्स आहेत. यामध्ये ६७२ जागा उपलब्ध होतात. (aiims.ac.in)   

बारावी सायन्सला बसलेले आणि ६०% पेक्षा अधिक गुणांसहित बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले 

जाहिरात नोव्हेंबर मध्ये येते आणि परीक्षा मे च्या सुमारास होते. 

 

३. अभियांत्रिकी 

३.१: जेईई मेन 

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजीसह इतर इंजिनिअरिंग संस्थेमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा घेण्यात येते.परिसकः दोन वेळा होते, जानेवारी च्या परीक्षेसाठी फॉर्म्स सप्टेंबर मध्ये निघतात तर  एप्रिलच्या परीक्षेसाठी फेब्रुवारी पासून अर्ज निघतात. 

 

याशिवाय इन्स्टीट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी आयआयएसईआर पीडियू अशा संस्थांमध्येही जेईई मेन्स परीक्षेतूनच प्रवेश होतो. 

 

जेईई ऍडव्हान्स (आयआयटी प्रवेशासाठी)

जेईई मेन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्स परीक्षेला बसता येते. परीक्षा मे मध्ये घेतली जाते.  

 

बिर्ला इन्स्टीट्यूट पिलानी राजस्थान(BITSAT- bits-pilani.ac.in) व्हीआयटी वेल्लौर (VITEEE) (vit.ac.in) ह्या आपापली परीक्षा घेतात. बिटसॅटचे अर्ज जानेवारीमध्ये निघतात आणि परिकसह मे मध्ये होते तर VITEE चे अर्ज नोव्हेंबर मध्ये निघून परीक्षा मे मधेय होते. 

 

महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागतर्फे एमएचसीईटी परीक्षा मे च्या सुमारास घेतली जाते. 

 

४. फार्मसी

डीटीई मार्फत फार्मसीच्या प्रवेशासाठी MH-CET ही परीक्षा घेतली जाते. बारावी विज्ञान नंतर परीक्षा देता येऊ शकते. परीक्षा मे च्या सुमारास घेतली जाते. 

५. कृषी

देशपातळीवरील ७३ क्रुषि विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता १५% कोट्यासाठी भारतीय क्रुषि अनुसंधान परिषद (आयसीएसआर) द्वारे एआयईईई परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येते.  

 

महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागतर्फे एमएचसीईटी परीक्षा मे च्या सुमारास घेतली जाते.  

 

६. पशुवैद्यक शास्त्र 

देशातील ३६ पशुवैद्यक महाविदयालयांतील १५% कोट्यासाठी भारतीय पशुचिकित्सा परिषदेतर्फे ऑल इंडिया व्हेटर्नरी टेस्ट घेण्यात येते. (vci.nic.in)

 

महाराष्ट्रातील सहा शासकीय महाविदयालयातील प्रवेशासाठी नीट अभ्यासक्रमानुसार जागा भरल्या जातात. (mafsu.in)

 

७. मूलभूत विज्ञान 

 

नेशनल इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भुवनेश्वर आणि मुंबई विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ एटोमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस यामधील पाच वर्षे इंटग्रेटेड कोर्स साठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. 

 

८. हॉटेल मेनेजमेंट

 

NCHMCT: नेशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मेनेजमेंट च्या ५१ संस्थांमधून साडेसात हजार जागा उपलब्ध असतात. कुठल्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेई शकतो.(nhmct.org)

महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागतर्फे MAH-CET (HM): राज्य शासनाच्या ९ हॉटेल मॅनेजमेंट मधील ४७० जागांच्या प्रवेशासाठी डीटीई तर्फे मे महिन्यात परीक्षा घेण्यात येते. 

 

९. आर्किटेक्चर शाखा:

आर्किटेक्चर शाखेसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट टेस्ट (नाटा) घेण्यात येते. राज्यातील तीन शासकीय संस्था आणि ७८ खळगी संस्थांमधून ५१०० जागा उपलब्ध. (www.nata.in)

 

महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागतर्फे  एमएचसीईटी हि परीक्षा मे च्या सुमारास घेतली जाते. 

 

१०. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स 

कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासकीय आणि खासगी महाविद्यालयात बीएफए प्रवेशासाठी MH -CET (AAC) घेण्यात येते. (www.doa.org.in) . परीक्षा मे च्या सुमारास घेतली जाते.  

 

११. कायदा: 

सीएएलटी : परीक्षा मे च्या सुमारास होते आणि त्याचे फॉर्म्स जानेवारी पासून निघतात. नॅशनल लॉ विद्यापीठांच्या प्रवेशासाठी हि परीक्षा होते. clat.ac.in

 

महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागतर्फे एमएएच-एलएलबी परीक्षा (५ वर्षे इंटिग्रेटेड आणि ३ वर्षे) एप्रिल आणि मेच्या सुमारास घेतली जाते. http://cetcell.mahacet.org/

 

१२. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन

डिझाईन क्षेत्रातील ह्या सर्वोत्तम संस्थेतील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. 

 

१३. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी

bottom of page