top of page
निमलष्करी दलातील संधी

प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यातील बीएसएफ च्या बाईकवीरांची कौशल्य पाहून अचंबित झालात का? या दलांना निम लष्करी दले म्हणतात. अंतर्गत सुरक्षा, नक्षलवादासारख्या समस्या अगदी आपत्तीग्रस्त भागांमध्ये निर्माण होणार्या समस्या यांमध्ये निमलष्करी दले सहाय्यभूत होतात. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत निमलष्करी दलांचे महत्व  अनन्यसाधारण आहे. तसेच तिबेट, भूतान या देशांच्या सीमा रक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. त्यामुळे येथे भारताला खडे लष्कर तैनात करावे लागते. 

 

या सर्वांमध्ये मदत करतात ती निमलष्करी दले. मागील एका लेखात आपण लष्करातील संधींविषयी जाणून घेतले होते. आता पाहूया निमलष्करी दलातील संधींविषयी. 

 

बोर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा बल, आसाम रायफल्स, इंडो- तिबेट पोलिस, रिझर्व पोलिस फोर्स (सीआरपीएफ), इंडस्ट्रीअल सिक्यूरिटी फोर्स (सीआयएसएफ), टेरीटोरिअल आर्मी हे निमलष्करी दलाचे प्रकार आहेत.  

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन तसेच केंद्र लोकसेवा आयोग (राजपत्रित पदे) या सर्व दलांसाठी (टेरिटोरीअल आर्मी वगळता) परीक्षा घेते. विशिष्ट शारीरिक क्षमता असणार्या विद्यार्थ्यांनाच लेखी परीक्षेलाबसता येते, आणि त्यातून उत्तीर्नांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाते. 

 

पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही यासाठी अर्ज करता येतो. 

 

कॉन्स्टेबल

शैक्षणिक अर्हता: किमान दहावी 

वयोमर्यादा: १८-२३

 

मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती जमातींसाठी अट थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आलेली आहे. 

 

सबइन्स्पेक्टर 

शैक्षणिक अर्हता: पदवी 

वयोमर्यादा: २०-२५ वर्षे

विशिष्ट शारीरिक क्षमता 

 

असिस्टंट कमांडन्ट 

शैक्षणिक अर्हता : किमान पदवी (+एनसीसी किंवा खेळातील नैपुण्य अधिक ग्राह्य असेल)

वयोमर्यादा: १९-२५

विशिष्ट शारीरिक क्षमता

 

असिस्टंट कमांडन्ट (तांत्रिक)

बीएससी (भौतिकशास्त्र, गणित, आणि रसायनशास्त्र)

 

असिस्टंट सब इन्स्पेक्टर (रेडीओ मेकेनिक)

शैक्षणिक अर्हता: बारावी (भौतिकशास्त्र, गणित, आणि रसायनशास्त्र सहित ५०%) किंवा दहावी आणि तांत्रिक विषयातील डिप्लोमा. 

वय: १८-२५

विशिष्ट शारीरिक क्षमता

 

हेड कॉन्स्टेबल (ऑपरेटर आणि फिटर)

शैक्षणिक अर्हता: दहावी आणि दोन वर्षांचा आयटीआय किंवा बारावी विज्ञान (भौतिकशास्त्र, गणित, आणि रसायनशास्त्र सहित)

वय: १५-२३

 

याव्यतिरिक्त काही विशिष्ट पद भरती हि दले आपापल्या पद्धतीने घेत असतात.  दहावी, बारावी आणि पदवी अशा तीन पदांवर हि भरती होत असते. 

 

याव्यातीतीक्त कायद्याचे पदवीधर आणि या विषयातील तज्ज्ञ तसेच डॉक्टर्स यांना सुद्धा अनेक पदांवर भरती निघत असते. 

 

 

अधिक माहितीसाठी:

www.bsf.nic.in/

www.crpf.nic.in/

www.assamrifles.gov.in/

wwwitbpolice.nic.in

www.ssb.nic.in/

 

सैन्य आणि निमलष्करी दलातील भरती-अधिक मार्गदर्शन आणि माहितीसाठी:

प्रबोधक: हर्षद माने ९९६७७०६१५०

bottom of page