top of page
  भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा 

अभियांत्रिकी हे फार प्राविण्याचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्रामध्ये सेवा परीक्षा उपलब्ध आहे याची कल्पना बर्याच अभियांत्रिकी पदवीधरांना नसते. 

 

केंद्रीय प्रशासकीय सेवा म्हणजे युपीएससी बद्द्ल आपल्याला थोडीफार माहिती असते. अनेक अभियांत्रिकी पदवीधर या परीक्षांना बसतात. या परीक्षांना उत्तीर्ण होणार्यांमध्ये अभियांत्रिकी पदवीधर किंवा मेडिकल पदवीधारांचे प्रमाण अधिक आहे.  

 

मात्र या व्यतिरिक्त केंद्र शासन अभियांत्रिकी सेवांसाठी विशेष प्रशासकीय सेवा घेते. याला अभियांत्रिकी सेवा परीक्षा असे म्हणतात. याबद्दल आपण माहिती घेऊ. 

 

अभियांत्रिकी सेवा परीक्षा 

चार अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधर हि परीक्षा देऊ शकतात. 

१. सिव्हिल अभियांत्रिकी 

२. मेकानिकल अभियांत्रिकी 

३. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी 

४. इलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन 

 

भरण्यात येणारी  पदे 

या सेवा परीक्षांमधून भरण्यात येणारी  पदे हि प्रशासकीय सेवान्प्रमानेच "अ" गटातील असतात. रेल्वे, रेल्वे स्टोर्स सर्व्हिसेस, सेन्ट्रल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, संरक्षण सेवा, ओर्डंस सर्विसेस, सेन्ट्रल इंजिनीअरिंग सर्विसेस रोड्स, एक्झिक्युटिव सर्विसेस, पावर इंजिनीअरिंग, नेव्हल आर्मामेंट, सेन्ट्रल मेकेनिकल, इंडियन इन्स्पेक्शन सर्व्हिसेस. ह्या आस्थापनांमध्ये सर्व अभियांत्रिकी क्षेत्रासाठी विविध पदे उपलब्ध असतात. 

 

पात्रता:

१. भारतीय रहिवाशी 

२. वयोमर्यादा: २१-३० वर्षे 

 

परीक्षा 

इंजिनिअरिंग सेवा परीक्षा १००० गुणांची असते. यामध्ये ६०० गुणांचे बहुपर्यायी आणि ४०० गुणांचे दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातात. 

 

सामान्य क्षमता चाचणी २०० गुण        

 अ) इंग्रजी            

 ब)  सामान्य ज्ञान  

अभियांत्रिकी विषय पेपर १   २००

अभियांत्रिकी विषय पेपर २   २००

 

दीर्घोत्तरी

अभियांत्रिकी विषय पेपर १  २००

अभियांत्रिकी विषय पेपर २   २००  

 

अभ्यासक्रम

सामान्य क्षमता चाचणीची पातळी दहावी ची असते. यामध्ये इंग्रजी मध्ये इंग्रजी कोम्पोसिशन, ग्रामर यावर प्रश्न विचारले जातात. 

 

बहुपर्यायी आणि दीर्घोत्तरी प्रश्न अभियांत्रिकी परीक्षांच्या पदवी परीक्षेच्या पातळीचे असतात.  

 

ऑनलाईन अर्ज:

अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी  www.upsconline.nic.in या वेबसाईट वर ओन्लाइन अर्ज करता येईल. 

 

त्यामुळे अभियांत्रिकी पदवी झाल्यानंतर नोकरी शोधण्यापेक्षा भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये आपले करिअर बघा. यामध्ये प्रतिष्ठा आहे, पैसा आहे. 

 

bottom of page