top of page

तुम्हाला वाटते का कि आपल्या नोकरीत प्रतिष्ठा असावी? आपण जाऊ तिथे लोकांनी आपल्याला साहेब असे म्हणावे? लोकांनी आपल्याला ओळखावे? त्यांच्या समस्या घेऊन आपल्याकडे विश्वासाने यावे आणि आपण त्या पूर्ण कराव्यात? लोकांच्या उपयोगी पडताना कर्तव्य निभावण्याचेही समाधान असावे आणि तो आपल्या नोकरीचाच भाग असावा? असे वाटते का कि आपल्याला लाल गाडीतून फिरता यावे?

 

लोकसेवा या शब्दातच या सेवांचे मर्म आहे. हि नोकरी म्हणजे लोकांची सेवा आहे. कुठलीही शासकीय नोकरी हि लोकांची सेवा असते. तुम्ही तुमची बुद्धी कामात ओतता,दिवस रात्र मेहनत करता, विचार करता कृती करता हि सर्व लोकांच्या भल्यासाठी असते. तुमची नोकरीतील दैनंदिन कामेही लोकांचे काही न काही भलेच करून जातात. तुमच्याकडे निर्णयक्षमता येते, अधिकार येतात आणि तुमच्या निर्णयांचा, फाईल्स वर केलेल्या नोटींग्सचा लोकांच्या भाल्यावर परिणाम होत असतो. विश्वास ठेवा, इतके अधिकार, कामातील हा आनंद इतर कुठल्याही खासगी नोकरीत मिळत नाही. 

शासकीय अधिकार्यांचा मन मरातब- तोरा आणि त्याहून अधिक हाती असणारे अधिकार- ज्यायोगे तुम्ही लोकांच्या भल्यासाठी राबू शकता, आपल्या हाताखालील लोकांना काम करण्यास लावू शकता, लोकांचा विश्वास जिंकू शकता, त्यांना आनंद देऊ शकता!

 

आणि तुमची अशी धारणा असेल कि राजपत्रित अधिकारी म्हणजे मंत्र्यांच्या ताटाखालील मांजर होऊन राहणे, हांजी हांजी करणे तर कृपया हा समज काढून टाका. कारण शासकीय नोकरीत प्रत्येक वेळा तुमचा मंत्र्यांशी संबंध येतोच असे नाही, किंवा प्रत्येक मंत्री तुमच्याशी वाईट वागेलच असे नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटातील मंत्र्याची इमेज तुमच्या मनात असेल तर ती काढून टाका. 

महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवा 

राज्यसेवा, पोलिस सब इन्स्पेक्टर,

विक्रीकर निरीक्षक  

 

इतर शासकीय नोकऱ्या

शासकीय नोकरी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर युपीएससी आणि एमपीएससी येतात. मात्र या व्यतिरिक्तही अनेक प्रकारच्या शासकीय सेवा उपलब्ध आहेत. बर्याचदा याची माहितीही आपल्या  मुलांना नसते.

bottom of page