top of page

नेहमी पडणारे प्रश्न

 

आम्हाला अनेक ठिकाणी काही समान प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही देत आहोत. तुम्हाला अजून काही प्रश्न पडत असतील, तर आम्हाला इ-मेल वर कळवा . त्याची उत्तरे आम्ही इथेही देऊ, आणि तुम्हाला मेल वरही पाठवू.

01

02

03

04

05

06

07

08

शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा काय आहे?

​केंद्रीय प्रशासकीय सेवा देण्यासाठी २१-३२ वर्षापर्यंत विद्यार्थी पात्र आहे. ओबीसी (नॉन क्रीमिलेयर) साठी ३५ वर्षे (+३) आणि एससी एसटी वर्गासाठी ३८ वर्षे (+५ वर्षे) वयोमर्यादा आहे. महाराष्ट्र राज्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी वयोमर्यादा  गटासाठी ३८ वर्षे केली आहे.

इतर सर्व परीक्षांसाठी वयोमर्यादा बदलत असते. सैन्यातील करिअर साठी ती २५ ते २७ वर्षे, आयबीपीएस आणि स्टेट बँकांच्या परीक्षांसाठी ३० वर्षे आहे. इतर अनेक परीक्षांसाठी (केंद्राच्या) वयोमर्यादा ३० वर्षे असते.
टेरीटोरीअल आर्मी साठी वयोमर्यादा ४२ वर्षे आहे. हा एक अर्धवेळ सैन्याची सेवा करण्यासाठी चांगला पर्याय आहे.
अनेक शासकीय मंडळे, कंपन्या वगैरे विशेष प्राविण्य असणार्या, विशिष्ट अभ्यास केलेल्या आणि विशिष्ट वर्षांचा अनुभव असणार्या पदांच्या भारती निघत असतात. त्यासाठी वयोमर्यादा शिथिल केली जाते.

 
नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट म्हणजे काय?
तुमची इतर मागासवर्गीय गटात मोडत असाल, तर सरसकट सर्वांनाच आरक्षणाचा फायदा मिळत नाही. ज्यांचे एकूण कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत आहे, त्यांनाच हा मिळतो. अशांना नॉन क्रिमिलेअर असे म्हटले जाते. 

आपले सरकार या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाइन अर्ज भरू शकता तसेच महाइ सेवा केंद्रात जाउन तुम्ही अर्ज भरू शकता.

तुमच्या जातीचा प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्न पुरावा [३ वर्षांचे आयकर दाखले/तहसिलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र] आणि उत्पन्न आणि जाती बद्दल एफ़िडेव्हीट द्यावे लागते. अधिक माहिती

 

जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवावे?

​अर्ज आपले सरकार संकेतस्थळावर किंवा महा ई सेवा केंद्रात करता येईल.

अर्जाबरोबर जोडावयाची प्रमाणपत्रे:

अ) अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला/किंवा जन्म दाखलाकिंवा सरकारी नोकर असल्यास सर्विस पुस्तकाचे पहिले पान

ब) अर्जदाराचे वडील/ आजोबा/ वडिलांकडून काका/काकी यांचा शाळा सोडल्याचा दाखला/किंवा जन्म दाखलाकिंवा सरकारी नोकर असल्यास सर्विस पुस्तकाचे पहिले पान
(सर्व कागदपत्रे अटेस्टेड)

क) रहिवासाचा दाखला
अ) रेशन कार्ड पहिले आणि शेवटचे पान किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा निवडणूक यादीतील नोंद, भाडे पावती (सर्व कागदपत्रे अटेस्टेड)
रहिवाशाचे प्रमाणपत्र खालील दिवसाचे असावे.
अर्जदार, किंवा त्याचे वडील किंवा आजोबा हे खालील दिवशी रहिवासी होते असा दाखला मिळवावा लागतो.
१) एससी/एस टी                                     १८.०८. ९५०
२) विमुक्त आणि भटक्या जाती-जमाती         २१. ११. १९६१
३) इतर मागास वर्गीय                               १३. १०. १९६७  
४) भंडारी                                               १३. १०. १९६७
५) वैष्णवी                                              १३. १०. १९६७
६) एसबीसी                                             १३. १०. १९६७

अधिक माहिती

 

प्रशासकीय सेवा परीक्षेचा अभ्यास नक्की कसा करावा?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेविषयी आपल्याकडे खूप गैरसमजुती आढळतात. त्याचा फुकाचा बागुलबुवा आम्ही करून ठेवला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे कोल्ह्याला द्राक्षे आंबट. त्याप्रमाणे या परीक्षेचे तोंडही न पाहिलेली माणसे स्वतःचे (अ)ज्ञान दाखवण्यासाठी परीक्षेविषयी खूप गैरसमजुती पसरवतात. यामुळेच अर्धी मुले परीक्षेला बसतच नाहीत. केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम खूप मोठा असला तरी ज्या अर्थी इतकी वर्षे पदे भरली जात आहेत, त्या अर्थी परीक्षेचा अभ्यास आणि काठीण्य पातळी सामन्यांच्या कक्षेतच आहे. या परीक्षेसाठी ढोर मेहनतीची नव्हे, सुयोग्य नियोजनबद्ध मेहनतीची आवश्यकता आहे.

शासनाचे "इंडिया इअर बुक" जे दर वर्षी निघत असते ते वाचणे आवश्यक आहे.

आठवी ते दहावीची सामाजिक शास्त्रांची पुस्तके- इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान आणि अर्थ्शाश्त्र (एसएससी बोर्ड आणि एनसीइआरटी) आधी वाचावीत, नंतरच बाकी पुस्तकांना हात घालावा. साधारणतः, एका विषयाचे सर्वोत्तम पुस्तक (फारात फार दोन) कोणते ते घेऊन तेवढेच वाचावे. एकाच विषयाची अनेक पुस्तकात तेच तेच वाचून वेळेचा अपव्यय तेवढा होतो.

 

उद्योग करायचाय, पण कोणता ते समजत नाही

उद्योग करण्यासाठी सर्वात सोप्पी टेस्ट म्हणजे, तुम्ही कशात माहीर आहात हे तपासणे किंवा तुमच्या आजूबाजूला काय मिळत नाही ते पाहणे. तुम्ही कशात माहीर आहात ते तुमच्या परिसरात न मिळणार्या गोष्टींशी जुळले कि तुम्ही उत्तम व्यवसाय करू शकता. बर्याचदा आपले शिक्षण आपल्याला व्यवसायाचा मार्ग दाखवत असते. तुमचे शिक्षण, तुमची कला, तुमची खुबी यांची सांगड घातलीत कि तुम्हाला व्यवसाय कुठचा करायचा हे समजेल. याचाच अर्थ मित्र मैत्रीण करते किंवा अमक्या तमक्याला या व्यवसायात नफा झाला म्हणजे तोच धंदा करावा असे नव्हे. तुमच्या परिसराच्या भौगोलिक परिस्थितीमुळे कदाचित एखाद्या विशिष्ट प्रकारच्या व्यवसायासाठी ती जागा उत्तम असेलही. मात्र तुम्ही तो व्यवसाय करण्यासाठी योग्य आहात का , आणि त्याचे शिक्षण (तांत्रिक) तुम्ही घेतले आहे का हे तपासा!

 
उद्योगाची नोंदणी कशी करावी?

 

उद्योग सुरु करण्याचा विचार तर केला, पण तो प्रोप्रायटरशिप करावा, पार्टनरशिप करावा कि लिमिटेड कंपनी काढावी ते समजत नाही. त्याबद्दल माहिती घ्या.. 

 
लघु उद्योगाची नोंदणी कशी करावी?

तुम्ही लघु किंवा मध्यम उद्योग करीत असाल तर लघु-मध्यम उद्योग नोंदणी करणे चांगले आहे.
लघु आणि मध्यम उद्योगाची मर्यादा

  मायक्रो          गुंतवणूक १ कोटी आणि टर्नओवर ५ कोटी 

  स्मॉल             गुंतवणूक १० कोटी आणि टर्नओवर ५० कोटी 

  मिडियम          गुंतवणूक ५० कोटी आणि टर्नओवर २५० कोटी 

 तुमच्या आधार क्रमांकाच्या मदतीने: https://udyamregistration.gov.in/  या संकेतस्थळावर तुम्ही मोफत नोंदणी करू शकता.

 

 

उद्योगासाठी कर्जाच्या विविध योजना कोणत्या आहेत?

याची सविस्तर माहिती उद्योग करायचाय? पानावर आहेच. थोडक्यात आपण माहिती घेऊ. लहान उद्योगांसाठी दोन योजना लक्षात ठेवा. एक प्रधानमंत्री ग्रामीण रोजगार योजना. यात उत्पादन व्यवसायाला २५ लक्ष आणि सेवा उद्योगाला १० लक्ष पर्यंत कर्जावर शासन १५-२५% अनुदान थेट बँकेत जमा करते. यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज दाखल करावा. दुसरी म्हणजे, केंद्र शासनाची १ कोटी पर्यंत विनातारण कर्ज योजना. हि सोन्यासारखी योजना लोकांना आणि बँकांनाही माहिती नसल्याने किंवा बँकांच्या निरुत्साहामुळे मागे पडली आहे. कुठल्याही शासकीय, शेड्यूल्ड किंवा काही खासगी बँकान्कडेही हि योजना आहे. या दोन योजना तुम्हाला मदत देऊ शकतात. या व्यतिरिक्त कुक्कुटपालन, शेती, अन्नप्रक्रिया उद्योग, शीतगृह उद्योग, गोदाम उद्योग यांच्यासाठी नाबार्ड च्या विशेष योजना आहेत. अनेक महामंडळांच्या योजना आहेतच. याची माहिती उद्योग करायचाय? पानावर सविस्तर आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

bottom of page